पुणे : ”हो, मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. पण अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असे कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असे मी सांगतो,” असा पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खुलासा केला आहे.
पुण्यातल्या कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केला होता. पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता, याचा खुलासा सीपींनी करावा आणि अजित पवार यांचा फोन ताबडतोब जप्त करा आणि तपासणी साठी पाठवा, अशी मागणीही दमानिया यांनी केली होती.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मी कधीच कुणाला सोडण्यासाठी फोन केला नाही, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, पुण्यातील अपघात प्रकरणात डॉक्टर, पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे बेजबाबदारपणाचे कृत्य होते. नातू, वडील, आजोबांवर कारवाई केली.. जो दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असे कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असे मी सांगतो.
ते पुढे म्हणाले की, अपघात प्रकरणात कुणाचाही दबाव नाही. सुनील टिंगरे यांचे नाव घेतले जात होते, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. चौकशीअंती ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असे ते म्हणाले.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…