सहयोग लाभणार आहे | |
चांगला समन्वय असेल | |
सहकार्य मिळेल | |
वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे | |
मार्ग प्रशस्त होतीलसिंह : शिक्षणासाठी हा कालावधी आपणास चांगला आहे. नवीन कुठला तरी छोटा कोर्स पूर्ण करण्याकडे आपले लक्ष राहील. कोणत्याही टेक्निकल साइडमध्ये आपल्याला विशेष यश मिळेल. मात्र कोणत्याही कारणास्तव आळस करू नका. जास्त कष्ट आपणास यश देणारे आहे. विद्यार्थी वर्गाला आपण घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. अपेक्षित यश मिळून उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. कुटुंब परिवारातून मदत मिळेल. तसेच गुरुजनांचे आशीर्वाद मिळतील. शैक्षणिक भाग्योदय होईल. परदेशगमनाची शक्यता. नोकरीच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राहील. | |
यश येणार आहेकन्या : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला यश येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपण पूर्वी केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरताना पाहून आनंद होईल. नवीन संकल्पना तसेच नवीन तंत्रज्ञान वापरून, आपला व्यवसाय विशिष्ट जागेवर नेऊन ठेवण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धकांवर मात कराल. पद आणि प्रतिष्ठा याच्यामध्ये वृद्धी होईल. काही जुनी थांबलेली कामे परत सुरू होतील. आपल्याला जर काही गुंतवणूक करायची असेल, तर सोन्यामध्ये केलेली चांगली ठरेल. आर्थिक आलेख उंचावेल. | |
कुसंगत टाळातूळ : रोजच्या कामासह इतर कामांमध्ये जास्तीचा लोड वाढणार आहे. त्या प्रमाणात आपली एनर्जी लेव्हल कमी वाटणार आहे. आपण परिस्थितीशी सामना करण्यासाठी खूप प्रयत्न कराल; पण समाधान आपणास कमीच वाटेल. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपणास आत्मविश्वास कमी असल्याचे भासेल; पण आपण आत्मविश्वासाने कामे करावीत. आर्थिक गुंतवणूक करताना खूप सावधानता पाळली पाहिजे. विद्यार्थ्यांना हा कालावधी खूप महत्त्वपूर्ण आहे. कठीण परिस्थितीमध्ये आपण यश संपादन कराल. मात्र वेळेचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरेल. तसेच कुसंगत टाळा. | |
यश खेचून आणालवृश्चिक : आपल्या आजूबाजूला अनुकूल वातावरण असेल. बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम होण्याची आपण वाट बघत होता. ते काम मार्गी लागल्यामुळे आपल्या उत्साहात व आनंदात भर पडेल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच उत्साही राहाल. आपल्यामध्ये उच्च प्रतीचा उत्साह असल्यामुळे, कुठल्याही परिस्थितीशी सामना करण्यास तयार असणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण यश खेचून आणाल. कुठलेही काम आपण धाडसाने कराल, मात्र अतिआत्मविश्वास टाळणे महत्त्वाचे ठरेल. | |
विवाह ठरतीलधनु : कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. ज्यांचे विवाह करण्यामध्ये अडचणी येत होत्या, अशा अडचणी दूर होऊन, त्यांचे विवाह ठरतील. विवाहविषयक बोलणी यशस्वी ठरतील. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील. विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुख-शांतीपूर्वक चालेल. मात्र आपल्या संततीविषयी काही प्रकृतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संततीच्या भविष्याविषयी आपण चिंतीत असाल. गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणे. | |
प्रलोभने टाळामकर : आपण जर सरकारी क्षेत्रात काम करत असाल, तर या कालावधीमध्ये आपल्याला अपेक्षित सफलता मिळणार आहे. पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळेल. आपल्या कार्यकक्षेत वृद्धी होईल. तसेच जबाबदाऱ्याही वाढतील. आपली कार्य आपण आपल्या कार्यकक्षेमध्ये पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल. लहान-मोठी प्रलोभने टाळा, फायद्यात राहाल. फायनान्स आणि रियल इस्टेट क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल, तरी सुद्धा आपणास चांगले परिणाम मिळणार आहेत. ज्यांचे कमिशन एजंटचे काम आहे, त्यांनाही या कालावधीमध्ये चांगले आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. | |
धनप्राप्ती होऊ शकतेकुंभ : आर्थिकदृष्ट्या हा कालावधी आपणासाठी अतिउत्तम आहे. आपणास एकापेक्षा जास्त ठिकाणाहून धनप्राप्ती होऊ शकते. टेक्नॉलॉजी, मीडिया, सोशल मीडिया अशा माध्यमातून आपणाला धनप्राप्ती होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना महिला सहकार्याकडून सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे आपण जास्तीची अर्थप्राप्ती करू शकता. एकमेकांच्या सहकार्यामुळे आपण पुढे जाऊ शकता. विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित असेल. आपले शिक्षक तसेच आपले पालक आपणासाठी पूर्ण सहयोग देतील. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. शिष्यवृत्तीसह परदेशगमनाचे स्वप्न साकार होऊ शकते. | |
बढतीचे योगमीन : बुद्धिजीवी जातकांना तसेच साहित्य क्षेत्रातील मंडळींना व नोकरी करणाऱ्यांना सदरील सप्ताह अविस्मरणीय ठरू शकतो. उच्च व प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. त्यांची ओळख पुढे वाढणार आहे, त्याचा उपयोग आपणास लाभप्रद होणार आहे. जे जातक बेकार आहे, त्यांना नोकरी मिळेल. जे जातक नोकरी करत आहे, त्यांना बढतीचे योग आहेत. आपण जर कुठली जमीन खरेदी किंवा विक्रीसाठी विचार करत असाल, तर ते आपणासाठी लाभदायक आहे. पण त्यामध्ये थोडासा ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, तरीही यश मिळेल. विवाहासाठी सुद्धा हा कालावधी चांगला आहे. |
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…