Google Investment : विस्तारीकरणासाठी गुगलचा 'हा' मोठा निर्णय; तब्बल कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक

मुंबई : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलबाबत (Google) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जिओनंतर गुगलने आणखी एका नव्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात विस्तार करण्याच्या पार्श्वभूमीवर गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या क्षेत्रालाही या गोष्टीचा चांगलाच फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



गुगल 'या' कंपनीत गुंतवणार पैसे


ई- कॉमर्स क्षेत्रातील सर्वांत प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्ट (Flipcart) या कंपनीमध्ये गुगल गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. फ्लिपकार्ट कंपनी वॉलमार्ट कंपनीची उपकंपनी आहे. या फ्लिपकार्ट कंपनीचा काही हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव गुगलने ठेवला आहे. छोटी हिस्सेदारी खरेदी करून जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न गुगलकडून केला जात आहे. हा करार पूर्णत्त्वास गेल्यास गुगल अ‍ॅमेझॉनलाही (Amazon) ला टक्कर देणार आहे. ­



२९०० कोटी रुपये लावणार गुगल कंपनी


गुगल फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. ही गुंतवणूक साधारण ३५ कोटी डॉलर्स म्हणजेच २,९०० कोटी रुपयांची असू शकते. याबाबतची माहिती सध्या प्राथमिक स्तरावर असून लवकरच यावर ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



फ्लिपकार्टचा नेमका काय फायदा?


गुगलने ही गुंतवणूक केल्यास फ्लिपकार्टला क्लाऊट प्रोग्रॅमच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवता येईल. तसेच भारतातील संपूर्ण ग्राहकांना सेवा देण्यासाठी डिजिटल इन्फ्रा स्ट्रक्चर देखील मजबूत करता येणार आहे.

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत