Mumbai Rain updates : पुढील २४ तासांत मुंबईत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता!

मुंबई : मुंबईत गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण तयार होत असले तरी पाऊस बरसलेला नाही. मात्र, आज मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील २४ तासामध्ये कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील असंही सांगण्यात आलं आहे.


मान्सूनचे आगमन ३१ मे दरम्यान केरळात तर १० जूनदरम्यान मुंबईसह कोकणात तर १५ जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होऊ शकते.


मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


तर दुसरीकडे, आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन पुढचे तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मुरूड जंजिरा किल्लाही आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

Comments
Add Comment

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील

मुंबई महापालिकेत आर्थिक काटकसरीला सुरुवात

अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपात मुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या वेळापत्रकात बदल

मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये बदल मुंबई  : मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा –

मुंबई मेट्रो - ११ च्या प्रकल्पाच्या नवीन मार्गाची प्रक्रिया सुरू

मुंबई : नुकतीच संपूर्ण मेट्रो-३ मार्गिका कार्यान्वित होत असताना, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटडने (एमएमआरसीएल)

राज्यात ५,८६६ कोटी रुपये बँकांमध्ये बेवारस

मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र