Summer: उन्हाळ्याच्या दिवसांत जरूर खा हे पदार्थ

मुंबई: जसजसा उन्हाळा वाढत आहे तसतसे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज वाढत आहे. येथे काही पदार्थ सांगत आहोत जे उन्हाळ्याच्या दिवसांत खास खाल्ले पाहिजेत. खासकरून निसर्गाने आपल्याला आपल्याला असे काही पदार्थ दिलेत जे उन्हाळ्यात खाल्ले पाहिजेत.

दही


दही हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही दही कोणत्याही रूपात खाऊ शकता.

आवळा


आवळा हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यामुळे शरीर थंड राहते. तसेच प्रतिकारक्षमता वाढते.

पुदिना


पुदिन्याची प्रकृती थंड असते आणि उन्हाळ्यासाठी पुदिना चांगला. शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही आहारात पुदिन्याचा समावेश करू शकता. पुदिना डायजेशनमध्ये मदत करतो आणि पोटालाही शांत ठेवतो.

काकडी


काकडी थंड आणि हायड्रेटिंग असते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स आणि खनिजे असतात. काकडीच्या सेवनाने उन्हामुळे शरीराची होणारी काहिली कमी होते.

कलिंगड


कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्कृष्ट फळ आहे. यात पाण्याचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीर हायड्रेट राखण्यास मदत होते. यात व्हिटामिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असते.

नारळपाणी


उन्हाळ्याच्या गरम दिवसांमध्ये जर शरीर हायड्रेट ठेवायचे असेल तर नारळपाणी उत्तम आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
Comments
Add Comment

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी

रोज फिश ऑइल सप्लिमेंट्स घेताय? आधी हे वाचा !

मुंबई : सध्या निरोगी जीवनशैलीकडे झुकणाऱ्या अनेक लोकांचा कल हेल्दी डाएट, योगा, व्यायाम, आणि विविध सप्लिमेंट्सकडे

हे ६ पदार्थ देतात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम!

मुंबई : आपण बहुतांशवेळा कॅल्शियम म्हटले की दुधाचा विचार करतो. खरं तर, बऱ्याच लोकांना वाटतं की कॅल्शियम

वय वाढलं तरी त्वचा तरुण! 'या' ८ पदार्थांचे गुपित तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : त्वचेचं सौंदर्य फक्त बाहेरून लावल्या जाणाऱ्या क्रीम्स, फेस मास्क किंवा लोशन्सवर अवलंबून नसतं. यामागे खरा