मुंबई : एकीकडे उष्णतेच्या लाटेसोबत मुंबईकरांना आता पाणीबाणीच्या संकटाचाही सामना करावा लागणार आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करुन ठेवावा, तसेच पाणी जपून वापरा असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई महापालिकेच्या वतीने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात जलवाहिनीचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे दोन ठिकाणी १२०० मिलिमीटर व्यासाठी जलवाहिनी वळवण्याचे काम करण्यात येणार आहे. येत्या २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून २५ मे रोजी सकाळी ११.३० या वेळेत करण्यात येणार आहे. परिणामी २४ तासांसाठी घाटकोपर, मुलुंड आणि भांडुपमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारी म्हणून ४ ते ५ दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
एन विभागातील विक्रोळी गाव (पूर्व), गोदरेज रुग्णाल आणि गोदरेज प्रॉपर्टीज भागातील पाणीपुरवठा २५ मे मध्यरात्रीपासून सकाळी ११.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.
तसेच एस विभाग – नाहूर (पूर्व), कांजूर (पूर्व) भांडुप (पूर्व), संपूर्ण परिसर, टागोर नगर, कन्नमवार नगर, मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर, सीएट टायर मार्ग लगतचा परिसर, लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, क्वारी मार्ग व प्रतापनगर मार्ग लगतचा परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…