Arunatai Gadkari : धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनीला पॅरालिसीसचा अ‍ॅटॅक!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ भेट घेत केली विचारपूस


ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी (Arunatai Gadkari) गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना अचानक पॅरालिसीसचा अ‍ॅटॅक आला होता. त्यामुळे त्यांना ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तात्काळ त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


एकनाथ शिंदे यांनी अरुणाताईंवर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची माहिती व त्यांच्यावर सुरू असलेल्या औषधोपचाराबद्दल जाणून घेतले. यावेळी अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांना केली. अरुणाताई गडकरी यांच्यावर आता ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.



एकनाथ शिंदे काय म्हणाले?


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अरुणाताई गडकरी यांना पॅरालिटीक अ‍ॅटॅक आलेला आहे. आता त्यांना पाहायला आलो होतो. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांना ज्युपिटरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अरुणाताई गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे. ज्युपिटरमध्ये अधिक सुविधा उपलब्ध असल्यानं तिथं उपचार करणा आहोत. आता अरुणाताईंच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Comments
Add Comment

Crime News : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्या; मातेने केली चार मुलांची हत्या

उत्तर प्रदेश : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. एका मातेनेच पोटच्या चार मुलांची

Nashik: आईसोबतचा वाद टोकाला, ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नाशिक : नाशिकच्या पंचवटी (panchavti) परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या

CSK VS MI : घरच्या मैदानावरील पराभावाचा बदला घेण्याची मुंबईला संधी, MI आणि CSK साठी 'करो-या-मरो'चा सामना

IPL 2026 CSK VS MI : आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार २ मे) चेन्नई आणि मुंबई यांचा आमना-सामना होणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा

Spirit Airlines : स्पिरिट एअरलाईन्स ३४ वर्षांनंतर बंद, सर्व उड्डाणे रद्द ; १७ हजार नोकऱ्यांवर संकट

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकट आणि इंधनाच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

दिग्दर्शकाने बिकिनी घालून मिटींग ला बोलावल...मिथुन चक्रर्वीच्या सुनेचा खळबळजनक खुलासा....

मदालसा ही दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. अनुपमा मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी मदालसा शर्मा