मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा निकाल (Maharashtra Board 12th Result) जाहीर केला आहे. यामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून कोकण विभाग उत्तीर्णतेच्या टक्केवारीत टॉपला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष २०२४ चा निकाल हा ९३.३७ टक्के लागला आहे. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.९१ % लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल ९१.९५ % लागला आहे.
राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. त्यातील १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले. यावर्षी ९४.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९१.६० टक्के आहे. कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के लागला हे जाणून घ्या –
कोकण – ९७.९१ %
नाशिक – ९४.७१%
पुणे – ९४.४४%
कोल्हापूर – ९४.२४%
संभाजी नगर – ९४.०८%
अमरावती – ९३%
लातूर – ९२.३६%
नागपूर – ९२.१२%
मुंबई – ९१.९५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…