सहलीचे आयोजन करालमेष : आपल्या कार्यक्षेत्रात खूप काम वाढणार आहात, त्यामुळे धावपळही वाढणार आहे. खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्यांचे काम खूप वाढणार आहे, त्यामुळे परिवाराकडे लक्ष कमी दिले जाईल. यामुळे घरातील वातावरण आपणास चांगले ठेवावेच लागेल. घरातील व्यक्ती नाराज असतील. कुटुंबातील व्यक्तींना खूश करण्यासाठी एखाद्या छोटी-मोठ्या सहलीचे आयोजन कराल. प्रकृती स्वास्थ्याकडे चांगले लक्ष दिल्यामुळे, प्रकृती नीट असेल. प्रेमी-प्रेमिकांना मात्र हा कालावधी फारसा अनुकूल नाही. नात्यांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. उलाढाल वाढेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. | |
प्रवासाची शक्यता आहेवृषभ : या कालावधीमध्ये कुटुंबात तसेच भाऊ-बहीण यांच्या संबंधात काही गोष्टींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या जातकांना स्वतःच्या कार्यक्षेत्रात जास्तीचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे. | |
सकारात्मक विचार ठेवावेतमिथुन : आपल्या घराच्या नूतनीकरणासाठी आपला बराच खर्च होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आईच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या जातकांचा व्यवसाय कमिशन एजंट आहे, त्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी, तरच त्यांना चांगले लाभ होऊ शकतात. शेअर मार्केटमधील व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात सकारात्मक विचार ठेवावेत. त्या दृष्टीने आपली वाटचाल सफलतेकडे होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्या कामाच्या शैलीत सकारात्मक बदल झाल्याने, त्याचा त्यांना चांगला लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कार्याचा गौरव होईल. पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळण्याची शक्यता. | |
वादविवाद होण्याची शक्यताकर्क : आपल्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आवश्यक खर्चास कात्री लावणे हितकारक ठरेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागेल. राहत्या घरात भौतिक सुखसुविधा वाढविण्याकरिता खर्च होऊ शकतो. आपल्या जीवनशैलीतही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. महिलांचे आपल्या जोडीदाराबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. वाद-विवादापेक्षा चर्चा करून आपले प्रश्न सोडवा. सामंजस्याने प्रश्न सोडवा. अन्यथा आपल्या मुलांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग आहेत. इतरांशी स्पर्धा टाळा. | |
नवीन संधी प्राप्त होतीलसिंह : आपल्या जिद्दीने, चिकाटीने आपण आपल्या कार्यात सफलता मिळवणार आहात. व्यापार-व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. मात्र संधीचे सोने करणे आपल्यासाठी आवश्यक आहे, हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. इतरांशी वाद-विवाद टाळणे क्रमप्राप्त ठरेल. सामाजिक कार्यात रस घ्याल. जे नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीच्या कामांमध्ये अभूतपूर्व यश मिळणार आहे. एखादी मोठी नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. शिक्षण वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल सुरू राहील. विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त होणार आहे. | |
मदतीची गरज लागू शकतेकन्या : व्यापार-व्यवसायात आपले जे उत्पादन आहे, त्या क्वालिटीपेक्षा चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्शन बाहेर लोकांना मिळाल्यामुळे, आपल्या व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. प्रेम प्रकरणापासून दूरच राहावे. वादविवाद होण्याची शक्यता आहे. गर्भवती स्त्रियांनी आपल्या खाण्या-पिण्याकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. महिला आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये खर्च करण्यात मग्न असतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आपणास अतिशय कामामुळे विश्रांती घेणे विसरून जाल. | |
आर्थिक फायदातूळ : आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात मंगल कार्याचे आयोजन होणार आहे. व्यापार-व्यवसायामध्ये एखाद्या मोठ्या कंपनीची आपल्याला ऑर्डर मिळणार आहे. गुंतवणूक वाढून मशिनरी खरेदी करण्याची आवश्यकता पडू शकते. प्रेमी-प्रेमिकांना हा कालावधी चांगला आहे. आपला जोडीदार उच्च घराण्यातील आणि श्रीमंत असू शकतो. प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला थोडे थकल्यासारखे वाटेल. खेळाडू व्यक्तींचे खेळ चांगले होतील. हा कालावधी आपल्या कार्यक्षेत्रासाठी चांगला आहे. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा देतील. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. | |
ज्ञान अद्ययावत ठेवण्याची गरजवृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वरिष्ठ व्यक्तींबरोबर वादविवाद होण्याची शक्यता. आपल्या रागावर नियंत्रण आवश्यक. तसेच आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. आपल्या नोकरीच्या ठिकाणी कामासंदर्भातील ज्ञान अद्ययावत ठेवण्याची गरज.बरोबरच्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. या कालावधीमध्ये शेअर मार्केटपासून लांबच राहावे. आपण जर नोकरीमध्ये बदल करण्याची इच्छा असल्यास, हा विचार काही कालावधीसाठी स्थगित करणे लाभकारक आहे. | |
वेळेचे नियोजन करणे गरजेचे ठरेलधनु : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश येण्यासाठी आपणास जास्त कष्ट घेणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करताना खूप विचार करा, अन्यथा करूच नये. शेअर बाजारासाठी गुंतवणूक करू नये. ज्यांना आपली प्रॉपर्टी भाडेतत्त्वावर द्यायची आहे, त्यांनी घर किंवा दुकानाच्या लिखापढी नीट कराव्यात. पैतृक संपत्तीमध्ये काही वादविवाद, कोर्ट-कचेरीची कामे असतील, तर ती पुढे ढकलावी. या विद्यार्थ्यांनी अपेक्षित यशासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे ठरेल. | |
चांगल्या वार्ता मिळतीलमकर : आपण आपले राहणीमान उंचवण्यासाठी जास्त प्रमाणात खर्च कराल. या कालावधीमध्ये आपले घराचे स्वप्न किंवा दुकानाचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे आहेत. हे बजेट पूर्ण करण्यासाठी | |
मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतेकुंभ : आपण जर कुठल्या सामाजिक संस्थेमध्ये काम करत असाल, तर ती संस्था नावारूपाला येईल, प्रसिद्धी पावेल. नोकरी करणाऱ्यांसाठी जर विचार केला, तर हा कालावधी आपणास बढतीसाठी चांगला आहे किंवा पगारवाढ होऊ शकते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यापार व्यावसायिकांना आपले कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी चांगली संधी आहे. या कालावधीमध्ये आपण घर खरेदी किंवा वाहन खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील राजकारणामध्ये पडू नये. कौटुंबिक स्तरावर आपली द्विधा मनस्थिती राहील. कुटुंबात थोडेसे वातावरण तणावपूर्णक राहील. मन शांत ठेवून, आत्मविश्वासपूर्वक निर्णय घ्या. | |
वैवाहिक जीवन चांगले असेलमीन : आपले वैवाहिक जीवन चांगले असेल. वैवाहिक जीवनात सकारात्मक ऊर्जा चांगली असेल. वैवाहिक सुख मिळेल. एकटे असाल, तर आपल्याला विरुद्धलिंगी व्यक्तीबरोबर आकर्षण निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आपले आई-वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आपल्याला सहकार्य लाभणार आहे. आपले प्रकृती स्वास्थ्य चांगले असले, तरीही आपल्याला दक्षता घेणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांबरोबर लांबचे प्रवास करावे लागू शकतात. कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. अति आत्मविश्वास काही वेळेस घातक ठरतो, लक्षात ठेवा. |
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…