काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे निधन

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील भुईंज गावी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.


त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.


प्रतापराव भोसले यांचा राजकीय प्रवास सातारा जिल्ह्यातील भुईंज गावच्या सरपंचपदापासून सुरु झाला. वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी चार वेळा विजय संपादन करुन राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केले.


कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातून १९८४, १९८९ आणि १९९१ अशा तीन लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करुन ते लोकसभेत गेले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले.


१९९७ साली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देत राज्यात सत्ता आणली. प्रतापराव भोसले यांना पक्षाने जी जबाबदारी दिली ती त्यांनी समर्थपणे पार पाडली. संधीचे सोने करत त्या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले.


आपल्या कारकिर्दीत त्यांनी राजकारणाबरोबर कृषी, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम केले. शासनाच्या विविध योजना सातारा जिल्ह्यात राबवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भोसले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, दोघांचा मृत्यू

खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सोमवारी पहाटे अपघात झाला. ट्रक, कंटेनर आणि एर्टिगा यांच्या अपघातात दोन जणांचा

Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या २६४० घरांसाठी तब्बल ९७ हजारांहून अधिक अर्ज; मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद

मुंबई :  शहरातील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या

Sangli : वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचारी कडे केली शरीर सुखाची मागणी . . .

सांगली : सांगली विभागीय एसटी महामंडळाच्या कार्यालयात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे.या कार्यालयात

Buldhana Crime News : मृत मुलगी जिवंत परतली! पोलिसांचा अजब तपास आणि बापाच्या 'त्या' चक्रावून टाकणाऱ्या कबुलीचा संपूर्ण थरार

बुलढाणा : एका थरारक सिनेमाच्या कथेलाही मागे टाकेल अशी धक्कादायक घटना बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Thane News : किळसवाणा प्रकार! चॉकलेट आईस्क्रीम खाताना दिसला किडा; उत्पादकावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यात एका पॅकबंद चॉकलेट आईस्क्रीम कोनमध्ये किडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर