Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्...

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली!


बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक बस जळून झालेल्या अपघाताने (Buldhana Bus Accident) सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. या भीषण दुर्घटनेत ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना अजूनही लोकांच्या चांगलीच लक्षात असताना आता पुन्हा तशीच एक दुर्घटना काल होता होता वाचली आहे. बुलढाणा येथून चारधाम यात्रेसाठी (Chardham yatra) निघालेल्या भाविकांच्या लक्झरी ट्रॅव्हल्सने मध्यप्रदेशातील शिवपुरीजवळ अचानक पेट घेतला. परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.


बुलढाणा येथील ३० तर धामणगाव बढे (ता. मोताळा) येथील ३० भाविक दोन ट्रॅव्हल्सद्वारे चारधाम दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, कोलारस पोलीस ठाण्याअंतर्गत शिवपुरी ते गुना या चारपदरी महामार्गावर एका बसने अचानक पेट घेतला. अचानक गाडीतून धूर निघताना दिसताच चालकाने बस थांबविली आणि भाविक प्रवाशांना ट्रॅव्हल्सखाली उतरण्यास सांगितले. प्रवासी उतरताच बसने पेट घेतला. आगीने संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतले. कोलारस पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविली. बसचा नुसता सांगडाच उरला आहे.


या दुर्घटनेतून बुलढाण्यातील तीस भाविकांचे प्राण वाचले. यात १८ महिला तर १२ पुरुष भाविकांचा व चालकाचा समावेश आहे. दरम्यान, या भाविकांना काल रात्री कोलारस येथील मंगल कार्यालयात थांबविण्यात आले होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे सावट! आज १९ जिल्ह्यांना यलो, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुसळधार सरींचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांवर काळे ढग दाटून आले आहेत. मंगळवारी

Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला

Revenue Department : नोंदणी व मुद्रांक विभागात 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती; महसूल विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा

Devendra Fadnavis : गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार मुंबई, दि. २७ : पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई

Maharashtra Revenue Department : महसूल विभागाच्या अभियानात ३,४३६ महिलांना शेतकरी दर्जा; ६ दिवसांत ४.३५ लाख नागरिकांना योजनांचा लाभ

मुंबई: महसूल विभागाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत

Titamba Ashram School : टिटंबा आश्रमशाळेतील विषबाधाप्रकरणी अखेर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

अमरावती : मेळघाटातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अन्नातून