Revenue Department : नोंदणी व मुद्रांक विभागात 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती; महसूल विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागांतर्गत कार्यरत असलेल्या 'दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक (अराजपत्रित गट-ब)' संवर्गातील 160 अधिकाऱ्यांना 'सह जिल्हा निबंधक, वर्ग-2 / सह दुय्यम निबंधक, वर्ग-2 / मुद्रांक उपअधीक्षक' पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश 27 जुलै रोजी जारी करण्यात आले. (Revenue Department)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या इतिहासात एकाच वेळी 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.



विभागनिहाय पाहता, कोकण विभागातील 59, पुणे विभागातील 42, नागपूर विभागातील 19, छत्रपती संभाजीनगर विभागातील 15, नाशिक विभागातील 14 आणि अमरावती विभागातील 11 अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. (Stamp Department)


नोंदणी व मुद्रांक विभाग राज्यातील दस्त नोंदणी तसेच मुद्रांक अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मालमत्ता खरेदी-विक्री, विविध करार आणि अन्य नोंदणी प्रक्रियांसाठी नागरिकांचा या विभागाशी सातत्याने संपर्क येत असतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरल्याने दस्त नोंदणीचे कामकाज अधिक वेगाने आणि कार्यक्षम पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.


या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या 'दुय्यम निबंधक श्रेणी-1 / मुद्रांक निरीक्षक' पदांची भरतीही पदोन्नतीद्वारे तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे विभागातील प्रशासकीय साखळी अधिक मजबूत होऊन नागरिकांना सेवा देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, नागरिकांना दस्त नोंदणीच्या सेवा जलद, पारदर्शक आणि विनाअडथळा मिळाव्यात, यासाठी विभाग कटिबद्ध आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावल्याने प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल आणि नागरिकांचा वेळही वाचेल, असे त्यांनी नमूद केले.


Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या