नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग लागली. यात बसमधील ८ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला तर २४ पेक्षा अधिक जखमी झालेत.
या अपघातात बळी पडलेले लोक पंजाब आणि चंदीगड येथे राहाणारे आहेत. हे भक्तगण मथुरा आणि वृदांवन येथून दर्शन करून परतत होते. बसमध्ये प्रवास करत अलेलल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार हे भक्तगण शुक्रवारी वाराणसी आणि मथुरा वृदांवन दर्शनासाठी निघाले होते. बसमध्ये ६० प्रवासी होते. यात महिला आणि मुलांचा समावेश होता. हे सर्व जवळचे नातेवाईक होते. पंजाबच्या लुधियाना होशियारपूर आणि चंदीगड येथे राहणारे होते.
शुक्रवार-शनिवारच्या रात्री ते दर्शन करून परतत होते. रात्री उशिरा साधारण दीड वाजण्याच्या सुमारास बसमध्ये आग लागली. दरम्यान, ग्रामस्थांनी चालत्या बसला आग लागल्याचे पाहिले. त्यांनी आवाज देत चालकाला बस रोखण्यास सांगितले मात्र बस थांबली नाही. त्यानंतर एका तरुणाने मोटारसायकलवरून बसचा पाठलाग केला आणि चालकाला आग लागल्याची सूचना दिली.
जोपर्यंत बस थांबली होती तोपर्यंत आग बरीच पसरली होती. ग्रामस्थांनी आपल्या प्रयत्नांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पोलीस आणि फायर ब्रिगेडची गाडी उशिरा तेथे पोहोचली. मात्र तोपर्यंत अनेक लोकांचा जळून मृत्यू झाला होता. यात ८ जणांचा जळून मृत्यू झाला.