Nashik scam : नाशिकच्या ८०० कोटींच्या घोटाळ्यात संजय राऊत आणि सुधाकर बडगुजरांचा हात!

संजय राऊतांच्या आरोपांवर शिवसेना व भाजपा नेत्यांचा पलटवार


नेमकं प्रकरण काय?


मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने नाशिक महापालिकेमार्फत खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचे अर्थात जमिनी ताब्यात घेऊन विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात नाशिक शहरातील ठराविक बिल्डरांचे आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनाच सातशे कोटी रुपये जमिनींचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. त्यासंबंधीचे पत्रही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवले आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडून चोख उत्तर देण्यात आलं आहे.


नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाशिकमध्ये ८०० कोटींचा घोटाळा केल्याच्या संजय राऊतांच्या आरोपावर शिवसेनेकडून (Shiv Sena) खुलासा करण्यात आला. ठाकरे गटाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) व खासदार संजय राऊत यांनी संगनमताने नाशिक महानगरपालिकेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी केला.


तर पालिका प्रशासनाने भूसंपादन करणाऱ्या जमिनीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. प्रस्ताव तयार करणे व मंजूर करण्यासाठी समिती होती. सर्व निर्णय समितीनुसार झाले आहेत. आम्ही भ्रष्ट्राचार केला तर मग तेव्हा आमची चौकशी का केली नाही? संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे भाजप नेते गणेश गीते (Ganesh Gite) यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या