Thursday, May 22, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

‘२०२९ लाही मोदीच पंतप्रधान बनणार’

‘२०२९ लाही मोदीच पंतप्रधान बनणार’

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसंदर्भात भाष्य केले होते. एका वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शहा यांना पंतप्रधान करतील, असे केजरीवाल म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


राजनाथ सिंह म्हणाले, माझे ऐका, भारतीय जनता पक्षाचा एक ज्येष्ठ नेते या नात्याने मला सांगायचे आहे की, २०२४ मध्ये तेच (नरेंद्र मोदी) भारताचे पंतप्रधान म्हणून राहतील आणि २०२९ मध्येही तेच भारताचे पंतप्रधान होतील. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, मला वाटते याहून अधिक स्पष्टपणे आणखी काहीही सांगता येणार नाही.


ज्या व्यक्तीने संपूर्ण जगात भारताचा डंका वाजवला. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे. २०१४ पूर्वी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जो देश १४व्या स्थानावर होता, तो आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी तयार आहे.

Comments
Add Comment