Manoj Jarange : दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात केलं दाखल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु आज अचानक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. दौऱ्यादरम्यान वाढत्या उन्हामुळे मनोज जरांगे यांना अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून आरक्षणाची मागणी होत आहे. गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे या मागणीचे नेतृत्व करत आहेत. या मागणीबाबत मनोज जरांगे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासाठी ते महाराष्ट्र दौरा करत आहेत. मात्र अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना हा दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालयात उपचारांकरीता दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू आहे. सतत होणारे दौरे आणि उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये तब्बल ९०० एकरात जाहीर सभा घेणार होते. ८ जून रोजी त्यांची ही सभा होणार होती. मात्र भीषण दुष्काळामुळे त्यांची ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषणाचीही घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,