Friday, January 17, 2025
HomeदेशWeather Update : 'या' भागात आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : ‘या’ भागात आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

तर मुंबईत ‘असं’ असेल वातावरण

मुंबई : एकीकडे लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा आणि दुसरीकडे अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) थैमान घातलं आहे. अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे मुंबईत टॉवर, होर्डिंग, पूल कोसळ्याच्या घटना घडल्या तर बंगळूरमध्ये चक्क २७०हून अधिक झाडं कोसळ्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. राज्यात या अवकाळी पावसाने चांगलच रौद्र रुप दाखवलं आहे. अशातच हवामान खात्याने (Meteorological Department) बंगळूर शहराला सावधानतेचा इशारा दिला आहे.

उत्तर भारतात मे महिन्यातील कडाकाच्या उन्हानं नागरिकांची लाही-लाही होत आहे. पण दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD) कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bengaluru) आज वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

१६ ते २१ मेपर्यंत यलो अलर्ट

१६ मे ते २१ मे पर्यंत बंगळुरूमधील हवामान खूप ढगाळ असेल. तसेच, सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याचीही शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. आठवडाभर शहरात मुसळधारेचा अंदाज आहे. १६, १७ आणि १९ मे रोजी वातावरण ढगाळ असू शकतं. तसेच, अधूनमधून ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील परिस्थिती काय?

तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उकाडा प्रचंड वाढला आहे. आजदेखील ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

जागतिक स्तरावरही तापमानात वाढ

जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या तीन दशकांमध्ये जगभरात उष्माघातामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक पंचमांश मृत्यू हे भारतात झाले आहेत. कोरड्या हवामानात आणि कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या भागात सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे निरीक्षण ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’ आणि नोआच्या मासिक अहवालात नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार मान्सून १९ मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर ३१ मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून ७ ते १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -