मैनपुरी : नवजात बाळाचा सांभाळ करणे म्हणजे डोळ्यात तेल घालून जपावे लागते. नवजात बाळाला कुठे काही त्रास होत असल्याचा अंदाज आपल्यालाच बांधावा लागतो. त्यामुळे लहान बाळाचे संगोपन करणे कठीण असते. उत्तर प्रदेशातून अशाच एका नवजात बाळाबाबतीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कुटुंबीयांनी त्यांच्या ५ दिवसीय नवजात बाळाला उन्हात ठेवलं मात्र त्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील घिरोर परिसरातील रहिवाशी विमलेश कुमारच्या पत्नीने शहरातील साई रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. मुलीची प्रकृती थोडी नाजूक असल्यामुळे डॉक्टरांनी मुलीला अर्धा तास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कुटुंबीयांनी मुलीला साधारण ११.३० वाजता रुग्णालयाच्या गच्चीवर उन्हात ठेवले. मात्र, कडक उन्हामुळे काही वेळातच मुलीची तब्येत बिघडली.
त्यानंतर दुपारी १२ वाजता कुटुंबीयांनी तिला उन्हातून खाली घेऊन आले असता थोड्याच वेळात मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया देत रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी घेतलेली अशी आक्रमक भूमिका पाहून डॉक्टर रुग्णालय सोडून फरार झाले आहेत.
दरम्यान, पीडीत कुटुंबीयांच्या आरोपांनुसार मैनपुरीच्या सीएमओ डॉ. आरसी गुप्ता यांनी एक पथक पाठवून संपूर्ण रुग्णालय सील केले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर नेमकं काय घडलं आहे याचे कारण समोर येणार आहे. मात्र, जन्मलेल्या मुलीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…