Thursday, July 18, 2024
Homeदेशदेशातील कुणी माई का लाल सीएए हटवू शकणार नाही

देशातील कुणी माई का लाल सीएए हटवू शकणार नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिले विरोधी पक्षांना खुले आव्हान

आझमगढ : विरोधी पक्षांनी हिंदू-मुसलमान करत आपली व्होटबँक तयार केली आहे. आता मोदीने यांचा बुरखा फाडला आहे. देशातील कुणी माई का लाल सीएए हटवू शकणार नाही, असे प्रतिपादन करत सीएएच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे.

आझमगड येथील प्रचारसभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार, सीएए, काश्मिर या मुद्द्यांवरून काँग्रेस व इंडिया आघाडीवर हल्लाबोल चढविला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुमच्याकडे जेवढी असेल तेवढी ताकद लावा. पण तुम्ही सीएए हटवू शकणार नाही. विरोधी पक्षांचा बुरखा फाटला आहे. गांधीजींचे नाव घेऊन जे लोक देशाच्या स्वातंत्र्यापासून सत्तेचे सोपान चढले. त्यांनीच गांधीचींचा विश्वास तोडला आहे. मोदीच्या गॅरंटीच्या अर्थ काय होत असेल, याचे ताजे उदाहरण म्हणजे सीएए कायदा होय. कालच सीएए कायद्यांतर्गत आश्रितांना भारताचे नागरिकत्व देण्याचे काम सुरू झाले आहे. हे लोक धर्माच्या आधारावर भारताच्या झालेल्या फाळणीची शिकार झाले असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसने भारतात आश्रयाला आलेल्या लोकांची कधीही दखल घेतली नाही. कारण हे लोक त्यांची व्होट बँक नव्हते. यामधील बहुतांश ओबीसी आणि मागास-दलित बांधव आहेत. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. काँग्रेसनेही तेच काम केले. सपा-काँग्रेस, इंडिया आघाडी यांनी त्यांच्यासोबत कुठलही चांगले काम केलेले नाही. त्यांनी या लोकांनी असे खोटे पसरवले की, त्यामुळे देशामध्ये दंगली झाल्या. आजही मोदींचा सीएए हा त्यांच्यासोबतच जाईल, असा दावा इंडिया आघाडीचे लोक करत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.

काश्मीरच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले की, आधी हे लोक काश्मीरच्या मुद्द्यावरून राजकारण करायचे. मात्र आता ते व्होट बँकेचं राजकारण करू शकणार नाहीत. आम्ही ३७० ची भिंत पाडली असल्याचा उल्लेखही नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच आज जग हे जनसमर्थन पाहत आहे. जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम जगाला आश्चर्यचकीत करत आहे. भारतातील लोकांना मोदींच्या गॅरंटीवर किती विश्वास आहे, हे जग पाहत आहे, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -