vaccine side effects : कोविशील्डप्रमाणेच 'कोवॅक्सिन' लसीचेही गंभीर दुष्परिणाम

नवी दिल्ली : ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीने जगभरातून त्यांची कोविड-१९ लस 'कोविशील्ड' मागे घेतली आहे. या लसीमुळे थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) नावाचा दुर्मिळ आजार होऊ शकतो. आता कोविशील्डप्रमाणेच कोवॅक्सिन (Covaxin) लसीचेही अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत.


भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोवॅक्सिन’ या स्वदेशी लसीच्या दुष्परिणामांबाबतही अहवाल समोर आला आहे. दावा करण्यात आला आहे की, ही लस घेतल्यानंतर सुमारे एक वर्ष त्याचे दुष्परिणाम मोठ्या संख्येने लोकांमध्ये दिसून आले. याचा सर्वाधिक फटका किशोरवयीन मुलांना बसला. काही दुष्परिणाम तर खूप गंभीर होते.


'इकॉनॉमिक टाईम्स' या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, या लसीच्या दुष्परिणामांवर 'निरीक्षणात्मक अभ्यास' करण्यात आला. यामध्ये लसीकरण झालेल्या एक तृतीयांश लोकांमध्ये काही, विशेष स्वारस्य असलेल्या प्रतिकूल घटना आढळून आल्या. हा अभ्यास अहवाल स्प्रिंगरलिंक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. हा अभ्यास बनारस हिंदू विद्यापीठाच्या सांखा शुभ्रा चक्रवर्ती आणि त्यांच्या टीमने केला आहे. अहवालानुसार, लसीकरण झालेल्या बहुतेक लोकांमध्ये एक वर्षासाठी दुष्परिणाम दिसून आले. या अभ्यासात १,०२४ लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ६३५ किशोर आणि ३९१ तरुण होते. या सर्वांना लसीकरणानंतर एक वर्षानंतर फॉलो-अप तपासणीसाठी संपर्क करण्यात आला.


अभ्यासात, 'व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन' हे ३०४ किशोरवयीन मुले म्हणजे सुमारे ४८ टक्के लोकांमध्ये दिसून आले. अशी परिस्थिती १२४ म्हणजेच ४२.६ टक्के तरुणांमध्येही दिसून आली. अहवालानुसार, किशोरवयीन मुलांमध्ये सामान्य विकार (१०.२ टक्के), आणि मज्जासंस्थेचे विकार (४.७ टक्के) दिसून आले. प्रौढांमध्ये सामान्य विकार (८.९ टक्के), मस्कुलोस्केलेटल विकार (५.८ टक्के), आणि मज्जासंस्थेचे विकार (५.५ टक्के) दिसले.


यामधील ४.६ टक्के महिला सहभागींमध्ये मासिक पाळीतील असामान्यता आढळून आली. तर २.७ टक्के आणि ०.६ टक्के सहभागींमध्ये अनुक्रमे डोळ्यातील विकृती आणि हायपोथायरॉईडीझम दिसून आले. सुमारे १ टक्के लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम दिसून आले. यामध्ये स्ट्रोकची समस्या ०.३ टक्के (म्हणजे ३०० पैकी एक व्यक्ती) आणि ०.१ टक्के लोकांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) आढळला.

Comments
Add Comment

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेप नवी दिल्ली : जीएसटी कमी