Sangli Crime : धक्कादायक! अंघोळीच्या साबणावरून पती-पत्नीमध्ये जीवघेणा वाद

नवऱ्याला धु-धु धुतलं... पकडीने अंगठा फोडला... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


सांगली : नवरा बायकोच्या पवित्र नात्यात भांडण होणं यात काही नाविन्याची गोष्ट नाहीच. मात्र सांगली येथे एका जोडप्याची छोट्याशा किरकोळ कारणावरुन जबरदस्त वाद झाल्याची घटना घडली आहे. फक्त अंघोळीचा साबण कुठे ठेवला, अशा प्रश्नावर नवऱ्याने उडवा उडवीचं उत्तर दिल्यामुळे नवरा बायकोमध्ये चक्क जीवघेणा वाद झाला आहे. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं असून रागाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कानशिलात लगावली. तर संतापलेल्या बायकोने पकडीने थेट नवऱ्याचा अंगठाच फोडला असल्याचा धक्कादायक प्रकार सांगली येथे घडला आहे.



नेमकं घडलं काय?


सांगलीत संजयनगर येथे पाटणे प्लॉटमध्ये ही घटना घडली आहे. सकाळी बायको अंघोळीसाठी जात असताना तिला साबण सापडला नाही. तिने नवऱ्याला साबण कुठे आहे, असं विचारलं. त्यावर तिच्या नवऱ्याने साबण बाथरूममध्ये असेल, असं उत्तर दिलं. या गोष्टीचा राग आल्याने बायकोने नवऱ्याला अपशब्द वापरले. तर तुम्ही मला तुम्ही मला साबण आणून देऊन दमताय का? असा प्रश्न तिने विचारला.


अशा किरकोळ कारणामुळे त्या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. नवऱ्याने देखील बायकोला शिवीगाळ केली. बायकोने नवऱ्याच्या हाताच्या अंगठ्यावर पक्कडने वार केला. यामध्ये नवऱ्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या भांडणावेळी सासू, सासरे, चुलत सासरे यांनीही तिच्या नवऱ्याला दमदाटी केली. तर आमच्या मुलीला त्रास देतो, तुला सोडणार नाही असंही नवऱ्याला धमकावले.


दरम्यान, धमकी दिल्यामुळे नवऱ्याने नजीकच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवऱ्याने केलेल्या तक्रारीवरून बायकोसह इतर तिघांविरोधात सांगलीच्या संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून याप्रकरणी पोलीस आणखी चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात

भुजबळांचे गैरसमज दूर करणार, शासननिर्णय व आश्वासनांची पूर्तता करण्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे

महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर उद्या सुनावणी

बालगंधर्व रंगमंदिर सज्ज पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग

पुणे मेट्रोचे गणेशोत्सवात साडेपाच कोटींचे उत्पन्न

पुणे : मानाच्या प्रमुख बाप्पांचे दर्शन, देखावे आणि विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गणेशोत्सवातील दहा दिवसांच्या

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन

मुंबई : राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास नोकरी जाणार!

पीएमपीएमएल चालकांसाठी  महत्त्वाची बातमी पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) अलीकडेच झालेल्या