PBKS vs RR: सॅम करनच्या खेळीने पंजाबला तारलं, ५ गडी राखुन राजस्थानला मारलं...

PBKS vs RR: राजस्थान आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात संजु सॅमसनने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जॉस बटलरच्या जागी संधी मिळालेल्या टॉम कोहलर-कॅडमोर याने १८ धावा केल्या. तर यशस्वी जयस्वाल ४ धावा बनवुन बाद झाला. कर्णधार संजू सॅमसन देखील काही खास करु शकला नाही. त्याने १५ बॉलमध्ये ३ चौकारांसह १८ धावा जोडल्या.


त्यानंतर आलेल्या रियान परागचं अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकलं. रियान पराग याने ३३ बॉलमध्ये ६ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. रियानच्या धावांमुळे राजस्थान सन्मानजनक आव्हान देऊ शकला. आर अश्विनने  १ सिक्स आणि ३ चौकारांच्या मदतीने २८ धावांचं योगदान दिलं. पंजाबकडून राहुल चहर, हर्षल पटेल आणि कॅप्टन सॅम करन या तिघांनी सर्वाधिक १-१ गडी बाद केले. तर अर्शदीप सिंह आणि नॅथन एलिस यांच्या खात्यात १-१ गडी बाद केले. राजस्थानन २० षटकांमध्ये ९ गडी गमावून १४४ धावा करु शकले.


राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर विशेष खेळी करु शकले नाहीत. प्रभसिमरन ६ धावा तर जॉनी बेअरस्टो १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला रोसोदेखील २२ धावांवर परतला. पण अडचणीच्या वेळी सॅम करनने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत संघाला सावरलं. जितेश शर्माने २२ धावांच योगदान दिले.राजस्थानकडुन युजवेंद्र चहल आणि आवेश खानने २-२ गडी बाद केले. तर ट्रेन्ड बोल्टने १ गडी बाद केला. पण करनने ४१ चेंडुत ६३ धावा बनवुन विजश्री खेचुन आणला. पंजाबने ५ गडी राखुन राजस्थानचा पराभव केला.

Comments
Add Comment

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी

आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.