Bollywood Movies : बॉलीवूड होणार मालामाल! एकाचवेळी प्रदर्शित होणार ‘हे’ बिग बजेट चित्रपट

Share

मुंबई : बॉलीवूड नेहमीच धमाकेदार कामगिरी करत असते. हिंदी सिनेसृष्टीतील सर्व अभिनेते आपला चित्रपट हिट होण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. नेहमीप्रमाणे यंदाही बॉलीवूडमध्ये अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे मोठ्या बजेटमध्ये बनले आहेत. कार्तिक आर्यन, अजय देवगण आणि अक्षय कुमार या तिन्ही मोठ्या अभिनेत्यांकडे सध्या बिग बजेट चित्रपट आहेत, ज्याच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळीही हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणार असल्यामुळे बॉलीवूड मालामाल होणार आहे.

त्याचबरोबर आता बॉलीवूड पुढील वर्षाच्या तयारीला लागली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील किंग शाहरुख खान आणि सलमान खान यासोबत इतर अभिनेत्यांचे येणाऱ्या वर्षी बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकाचवेळी पाच मोठ-मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे बॉलीवूड आणखी मालामाल होण्याची चर्चा सुरु आहे. अलीकडेच या चित्रपटांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे २०२५ हे वर्ष खूप स्फोटक असणार आहे.

‘या’ चित्रपटांची होणार भरघोस कमाई

  • किंग : शाहरुख खानच्या ‘किंग’ या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त त्याची मुलगी सुहाना देखील दिसणार आहे. हा चित्रपट पूर्णपणे सुहानाचा असणार होता. या चित्रपटात शाहरुख खानने तब्बल २०० कोटींची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. पण आता या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने त्याची तयारी पूर्वीपेक्षा मोठ्या स्तरावर केली जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग जून २०२४ मध्ये होणार आहे. पहिल्या शेड्यूलचे शूटिंग लंडनमध्ये होणार असून, त्यासाठी सुहानाने प्रशिक्षणही सुरू केले आहे. पुढील वर्षीच्या बिग बजेट चित्रपटांपैकी हा एक असणार आहे.
  • लाहोर १९४७ : सनी देओल आणि प्रिती झिंटाचा ‘लाहोर १९४७’ चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग जुलै २०२४ पर्यंत संपणार आहे. या चित्रपटाचे बजेट १०० कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ‘गदर २’ मधून चांगली कमाई केल्यानंतर हा चित्रपटही सनी देओलच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
  • सिकंदर : सलमान खानने यावर्षी ईदच्या दिवशी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली होती. पुढच्या वर्षी ईद २०२५ ला तो चित्रपटगृहात दाखल होणार आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर, त्याचे दिग्दर्शन एआर मुरुगदास करत आहेत. नुकतीच रश्मिका मंदान्ना या चित्रपटाशी जोडली गेली आहे. त्यामुळे ‘पुष्पा २’ अभिनेत्रीच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा ‘सिकंदर’लाही मिळणार आहे. हा एक बिग बजेट ॲक्शन थ्रिलर चित्रपट असेल.तर या चित्रपटात प्रीतम संगीत देत आहे.
  • वॉर २ : YRF Spy Universe चा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करेल. ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दोघेही सध्या आपापल्या भागाचे शूटिंग करत आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणीही दिसणार आहे. अलीकडेच या दोघांचाही एक लूक सेटवरून लीक झाला होता. ‘वॉर’चा सिक्वेल प्रत्येक बाबतीत मोठा असेल. यात भरपूर ॲक्शन आणि ड्रामा असणार आहे. त्याचे बजेटही २०० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.
  • लव्ह अँड वॉर : संजय लीला भन्साळी यांनी काही काळापूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती. यात रणबीर कपूरशिवाय आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचाही समावेश आहे. भन्साळी त्यांच्या चित्रपटांमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करतात, प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी प्रचंड टीम तैनात केली जाते. त्याचबरोबर या चित्रपटात तिन्ही अभिनेते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहेत.

Recent Posts

Test match : भारतीय महिलांचा दणदणीत विजय

कसोटी सामन्यात द. आफ्रिकेवर दहा विकेट्स राखून सरशी चेन्नई (वृत्तसंस्था) : शफाली वर्माचे द्विशतक (२०५…

7 mins ago

संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब

पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर टीका नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचे वक्तव्य गंभीर…

25 mins ago

मेधा पाटकर यांना ५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

मानहाणी प्रकरणी साकेत न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहाणी प्रकरणी…

44 mins ago

पुण्यात आढळला झिकाचा पाचवा रुग्ण

पुणे : एरंडवणेतील गणेशनगरमधील २८ वषीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त…

2 hours ago

दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती

देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…

3 hours ago

MP News : दिल्लीतल्या बुरारी प्रकरणाची मध्यप्रदेशात पुनरावृत्ती! दिवसही १ जुलैचाच!

मध्यप्रदेशात एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह आढळले लटकलेल्या अवस्थेत भोपाळ : दिल्लीत १ जुलै २०१८…

4 hours ago