मुंबई: भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळणार आहे. त्यानंतर भारतीयसंघात मोठा बदल होऊ शकतो. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची सुट्टी होऊ शकते. त्यांच्या जागी नवे कोच येऊ शकतात. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रक्रियाही सुरू केली आहे.
बीसीसीआयने सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. सोबतच भारतीय बोर्डाने नव्या प्रशिक्षकपदासाठीचे अर्जही मागवले. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहेत.
बीसीसीआयने द्रविडला वनडे वर्ल्डकप २०२३ पर्यंतसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यानंतर भारतीय बोर्डाने टी-२० वर्ल्डकप २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. हा वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे.
मात्र त्याआधी बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांना अर्जासाठीची शेवटची तारीख २७ मे निर्धारित करण्यात आली आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले की राहुल द्रविड यांना जर आपला कार्यकाळ वाढवायचा असेल तर ते या पदासाठी पुन्हा अर्ज दाखल करू शकतात. त्यांच्या अर्जावर विचार केला जाईल.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…