Tuesday, July 16, 2024
Homeक्राईमPune Crime : धक्कादायक! काळी जादू नष्ट करण्याच्या नावाखाली ज्योतिषाने महिलेकडून उकळले...

Pune Crime : धक्कादायक! काळी जादू नष्ट करण्याच्या नावाखाली ज्योतिषाने महिलेकडून उकळले १५ लाख

गुंगीचे औषध… अंतर्वस्त्रातील फोटो… नराधमाने कसा घातला गंडा?

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात एकामागोमाग एक धक्कादायक प्रकार घडत आहेत. कधी भीषण अपघात, कधी ड्रग्जची तस्करी, कधी मर्डर, मारामारी असे प्रकार घडत असताना पुण्यात आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. काळी जादू घालवतो असे म्हणत एका ज्योतिषाने महिलेला तब्बल १५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका २८ वर्षीय तरुणीची उत्तर प्रदेशमधील कृष्णनारायण तिवारी नावाच्या एका ज्योतिषाशी ओळख झाली होती. आपले पतीसोबत नेहमी भांडण होत आहे, असे तिने ज्योतिषी तिवारी याला सांगितले होते. यावर तुमच्या घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे, ती नष्ट करतो, त्यासाठी पूजा करावी लागेल, असे ज्योतिषाने संबंधित महिलेला सांगितले.

महिलेला सांगितल्याप्रमाणे ज्योतिषी एके दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालून त्या तरुणीच्या घरी गेला. पूजा झाल्यावर प्रसादात त्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीचे अंतर्वस्त्रातील फोटो काढले. नंतर तुझे हे फोटो तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या इतरांना पाठवेल अशी धमकी देत त्याने वेळोवेळी पैशांची मागणी केली. धमकीला घाबरून त्या तरुणीने १५ लाख ३० हजार रुपये त्याला पाठवले.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी उत्तर प्रदेशचा ज्योतिषी कृष्णनारायण तिवारी आणि अंतिम कृष्णनारायण तिवारी यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -