
गंगा पूजन आणि कालभैरवाचा घेतला आशीर्वाद
वाराणसीसोबत गेल्या १० वर्षांचे ऋणानुबंध शेअर करत झाले भावूक
वाराणसी : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) चांगलीच रणधुमाळी सुरु आहे. देशातील मतदानाचे (Voting) चार टप्पे पार पडले आहेत. अद्याप लोकसभेसाठी मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत. या निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे वाराणसी (Varanasi) लोकसभा मतदारसंघातून (LokSabha Constituency) निवडणूक लढवत आहेत. तर आज नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (PM Narendra Modi Nomination)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याआधी गंगा पूजन करत वाराणसीबरोबरचे गेल्या १० वर्षांचे ऋणानुबंध आठवत शेअर केले. पंतप्रधान मोदी यावेळी भावूक झाले होते. मोदींनी यावेळी भावना व्यक्त करताना आई गंगा मातेने मला दत्तक घेतले असल्याची प्रतिक्रिया दिली. काशी सोबत असलेले ऋणानुबंध सांगतानाही मोदी भावूक झाले. तसेच लोकांचे माझ्यावरील प्रेम पाहून माझ्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस आणखी वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये काय म्हटले?
“बाबा विश्वनाथांच्या नगरीतील देवरूप जनतेला वंदन आणि नमस्कार! आज माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण हा काशीच्या प्रत्येक कणाला नमस्कार करत आहे. आजच्या रोड शोमध्ये मला तुमच्या सर्वांकडून मिळालेला स्नेह आणि आशीर्वाद खूप अतुलनीय आहेत. त्यामुळे मी भारावून गेलो आहे आणि काहीसा भावूकही झालो आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या सावलीत १० वर्षे कशी गेली कळलेच नाही. गंगा मातेने मला बोलावले होते. आज आई गंगेने मला दत्तक घेतले आहे”, असं मोदी यांनी म्हटले.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवार अर्ज भरण्यासाठी सुरु केलेल्या रॅलीत अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशासह भाजपा आणि एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री वाराणसीमध्ये एकत्र आले होते. पंतप्रधानांच्या नामांकनात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सभा, मेळाव्यांचा धडाका सुरू आहे. कोणते सरकार येईल याचा अनेक ठिकाणी दावा केला जात आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. असे असले तरीही ४ जूनच्या निकालाकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
बाबा विश्वनाथ की नगरी की देवतुल्य जनता-जनार्दन का नमन और वंदन! आज मेरा रोम-रोम काशी के कण-कण का अभिनंदन कर रहा है। रोड शो में आप सबसे जो अपनत्व और आशीर्वाद मिला है, वो अकल्पनीय और अतुलनीय है। मैं अभिभूत और भावविभोर हूं! आपके स्नेह की छांव में 10 वर्ष कैसे बीत गए, पता ही नहीं… pic.twitter.com/FrzzjtlDNG
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2024