Nitesh Rane : घाटकोपरमधील होर्डिंग लावणाऱ्या कंपनीच्या मालकाचं उद्धव ठाकरेंशी कनेक्शन!

आमदार नितेश राणे यांचा गंभीर आरोप


मुंबई : मुंबईत काल दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि जोरदार पाऊस (Mumbai heavy rain) पडला. अगदी काही मिनिटांसाठी पडलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर काहींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग (Ghatkopar hoarding news) कोसळलं. या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा १४ वर गेला आहे. तर ७५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाचा थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊतांशी (Sanjay Raut) संबंध असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


नितेश राणे म्हणाले, काल वादळामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यात घाटकोपर परिसरात एक मोठं होर्डिंग पडलं. त्यात असंख्य निरपराध मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला. कालपासून एक माहिती बाहेर येत आहे की, जी संबंधित होर्डिग लावणारी कंपनी होती तिला आधीच मुंबई महापालिकेने होर्डिंग काढून टाकण्याची नोटीस पाठवली होती. कार्यकाळ संपल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली होती. तरीही त्या मालकाने ऐकलं नाही, त्याचं नाव भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) आहे.


आता हा भावेश भिंडे नेमका कोणाचा पार्टनर आहे? संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनिल राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेने सुनिल राऊतसह मातोश्रीमध्ये जाऊन फोटो काढला होता का? याचं उत्तर संजय राऊतने आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं, असं नितेश राणे म्हणाले.



पुढे ते म्हणाले, रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप करत बसायचं, पत्र लिहित बसायचं. मग एक पत्र पोलीस आयुक्तांना लिहा आणि मागणी करा की या भावेश भिंडेचे जे जे पार्टनर आहे, निरपराध लोकांच्या बळीला जे जबाबदार आहेत, त्या सगळ्यांवर एफआयआर दाखल व्हावी, त्यांची चौकशी करुन त्यांना अटक करावी. ती होर्डिंग वेळेत काढली असती तर आज ते सगळे मुंबईकर जीवंत असते, त्यांच्या कुटुंबावर दुखःद प्रसंग आला नसता, म्हणून कारवाई झालीच पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ