KKR vs MI: सुनील नरेनची ऐतिहासिक कामगिरी, शून्यावर बाद झाल्यानंतर केला रेकॉर्ड

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला शनिवारच्या सामन्यात हरवले. केकेआरने हा सामना १८ धावांनी जिंकला. हा सामना पावसामुळे १६-१६ षटकाचा रंगला. केकेआरसाठी सुनील नरेन बॅटिंगमध्ये काही खास करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मात्र बॉलिंगदरम्यान त्याने एक विकेट घेतली.


सुनील नरेनने या सामन्यात एक खास यश मिळवले. तो एका हंगामात ४००हून अधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू ठरला.


नरेनने आयपीएल २०२४मध्ये शानदार कामगिरी केली. त्याने १२ सामन्यात ४६१ धावा केल्या. या दरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतक ठोकले. नरेनची सर्वोत्कृष्ट कामगिरी १०९ धावा इतकी आहे. त्याने बॉलिंगमध्येही कमाल करताना १५ विकेट मिळवल्या. या दरम्यान २२ धावांत २ विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली. त्याच्या आधी जॅक कॅलिस आणि शेन वॉटसनने ही कामगिरी केली आहे.


वॉटसनने राजस्थान रॉयल्ससाठी २००८मध्ये खेळताना ४७२ धावा केल्या होत्या. सोबतच १७ विकेटही मिळवल्या होत्या. कॅलिसने कोलकातासाठी २०१२मध्ये खेळताना ४०९ धावा केल्या होत्या. सोबतच १५ विकेटही मिळवल्या होत्या.


दरम्यान, शनिवारचा सामना पावसामुळे प्रभावित झाला. यामुळे सामना १६ षटकांचा करावा लागला. केकेआरने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. या दरम्यान वेंकटेश अय्यरने २१ बॉलमध्ये ४२ धावा केल्या. नितीश राणाने ३३ धावांची खेळी केली. रमणदीप सिंहने ८ बॉलमध्ये नाबाद १७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला १३९ धावाच करता आल्या. इशान किशनने २२ बॉलमध्ये ४० धावा केल्या. रोहित १९ धावा करून बाद झाला. हार्दिकने २ धावा केल्या.


Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.