Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमChhatrapati Sambhajinagar : मातृदिनी उडाली खळबळ! गर्भनिदान करणारं रॅकेट पोलिसांनी केलं उद्ध्वस्त

Chhatrapati Sambhajinagar : मातृदिनी उडाली खळबळ! गर्भनिदान करणारं रॅकेट पोलिसांनी केलं उद्ध्वस्त

केवळ १९ वर्षीय तरुणी करत होती हा प्रकार

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मातृत्वाचा सन्मान करणारा दिवस (Mother’s day) साजरा केला जात असतानाच दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. देशभरात सगळीकडे महिलांच्या हक्कांविषयी आणि स्त्री-पुरुष समानतेविषयी जनजागृती होत असताना संभाजीनगरमधील ही घटना धक्का देणारी आहे. संभाजीनगरमधील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भलिंग चाचणी (Gender prediction test) केली जात होती, आश्चर्याची बाब म्हणजे केवळ १९ वर्षीय तरुणी या प्रकाराची मास्टरमाईंड होती. पोलिसांनी हे रॅकेट उधळून लावले असून या तरुणीला ताब्यात घेतले आहे.

छ. संभाजीनगरमध्ये तिरुपती नगर परिसरात राहत्या घरी लिंग निदान करणाऱ्या तरुणीवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केली जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आले.

आरोग्य विभागाच्या पथकाने अधिक चौकशी केली असता इंजिनिअरिंग करणाऱ्या एक तरुणीकडून हे गर्भनिदान केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी १२ लाख ७८ हजारांची कॅश देखील सापडली. या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य, सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप, टॅब देखील सापडले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. एका तरुणीने केलेला हा प्रकार पाहून शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यात बंदी असूनसुद्धा होत आहेत ‘हे’ प्रकार

गेल्याच आठवड्यात राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चिंता वाटावी एवढी कमी झालेली आहे. राज्यात बंदी असूनसुद्धा गर्भलिंगनिदान (Prenatal Sex Determination) आणि गर्भपात (Abortion) जोरात सुरु असल्याचं समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात याबाबत माहिती नमूद केली आहे. त्यामुळे या २२ जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तरचे प्रमाण म्हणजे एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण चिंतादायकरीत्या घटल्याचे समोर आले आहे. जालन्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -