Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वRBI : सरकारची भरणार पेटी; आरबीआयकडून मिळणार एक लाख कोटी!

RBI : सरकारची भरणार पेटी; आरबीआयकडून मिळणार एक लाख कोटी!

जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मागच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या वर्षात अनेक बँकांकडून विविध बदल करुन नवी नियमावली जाहीर केली जात होती. अशातच हे नवे आर्थिक वर्ष भारत सरकारसाठी चांगले ठरत आहे. या नवीन आर्थिक वर्षात सरकारच्या तिजोरीत मोठी वाढ होणार असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून (RBI) मिळालेल्या लाभांशाबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अहवालानुसार आरबीआयकडून या आर्थिक वर्षात सरकारला १ लाख कोटी रुपये मिळणार आहेत. (RBI Dividend Payment)

युनियन बँकेच्या अहवालात नेमकं काय म्हटलं?

युनियन बँक ऑफ इंडियाने एक अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रिझर्व्ह बँक सरकारला १ लाख कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा हा लाभांश जास्त असल्याचे सांगितले आहे. अहवालानुसार, मागील आर्थिक वर्षात ८७ हजार ४०० कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. यावर्षी १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेला ‘इतका’ व्याज मिळू शकतो

रिझर्व्ह बँकेचे मुख्य उत्पन्न हे व्याज आणि परकीय चलनातून होते. रिझर्व्ह बँकेच्या ताळेबंदातील सुमारे ७० टक्के रक्कम परकीय चलन संपत्तीच्या स्वरूपात आहे, तर २० टक्के सरकारी रोख्यांच्या स्वरूपात आहे. या सिक्युरिटीजमधून रिझर्व्ह बँकेला १.५ लाख कोटी ते १.७ लाख कोटी रुपयांच्या दरम्यान व्याज मिळू शकते, असा अंदाज अहवालात दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -