सिन्नर शहरासह तालुक्याला अवकाळीने झोडपले

नाशिक : सिन्नर : सिन्नर शहरासह तालुका परिसरात अक्षय तृतीयाच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर वातावरण अचानक ढगाळ झाले. त्यानंतर दुपारी ३ ते ४:३० वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.


या पावसाने सिन्नर शहरातील नागरिकांची तसेच शेतकरी राजाची कांदे झाकण्यासाठी धावपळ उडाली. तर दुसरीकडे पूर्वमशागतीसाठी हा पाऊस पंधरा दिवसाने पडला असता तर शेतकरी राजाला फायदेशीर होता. पण काही ठिकाणी पाऊस जास्त तर काही ठिकाणी पाऊस थोड्याफार प्रमाणात पडल्याने शेतकरी राजाची चिंता वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.


सिन्नर शहरासह तालुक्यात सगळीकडे पाऊस असल्याचे असल्याचे चित्र दिसून आले. परिसरात शुक्रवारी सकाळी अतिउष्ण वातावरण होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले, तर ३ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.


या पावसात चिमुकल्यांनी भिजण्याचा आनंद घेतला, तर बघता बघता हलक्या पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एकीकडे उष्णता ने अंगाची लाही होत होती, त्यातच पाण्याचा तुटवडा जाणवत होता, अशातच अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकरी राजा सुखावला असल्याचे दिसून आले.

Comments
Add Comment

नराधमास मरेपर्यंत जन्मठेप, सोलापूर जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, दंड भरला नाही तर.

सोलापूर जिल्हा न्यायालयाने १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा सुनावली आहे. शीतपेयात

लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ आहे तरी कसा, पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी..

दुबई :आयपीएलचा लिलाव अखेर पार पडला.या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने चाणाक्ष खेळी केली.मुंबई इंडियन्सकडे

सौदी अरेबियामध्ये एका वर्षात ३४० लोकांना फाशी देण्यात आली

सौदी अरेबियाने या वर्षी आतापर्यंत ३४० लोकांना मृत्युदंड दिला आहे.ही संख्या गेल्या वर्षीच्या ३३८ च्या विक्रमाला

भर संसदेत महिला खासदार एकमेकींशी भिडल्या...

मेक्सिकोतील संसदेत हाणामारी झाली आहे.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे

मुलांच्या आरोग्याशी खेळ?

विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी सांडपाणी दिल्याचा आरोप ठाणे : दिव्यातील मातोश्रीनगर परिसरातील एका खासगी शाळेत

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रांचे मुद्रांक शुल्क माफ

नागपूर : गेल्या वर्षी १६ ऑक्टोबरपासून मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. यानुसार, सर्व