Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजरणसंग्राम २०२४राजकीयमहत्वाची बातमी

काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे शिंदे, अजितदादांना साथ द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शरद पवारांना आवाहन

काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे शिंदे, अजितदादांना साथ द्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शरद पवारांना आवाहन

नंदुरबार : महाराष्ट्राचे एक दिग्गज नेता. गेल्या ४०-५० वर्षांपासून राजकारणात आहेत. ते काहीबाही बोलत असतात. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करुन असे वक्तव्य दिले असावे, असे मला वाटते. ते निराश व हताश झाले आहेत. ४ जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये टिकून राहायचे असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल, असे त्यांना वाटत आहे. याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे तुम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना साथ द्यावी. सर्व स्वप्न पूर्ण होतील, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुले आवाहन केले आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून हा नंदुरबार येथे जाहीर सभा घेतली त्या सभेत ते बोलत होते. याच्यापूर्वी २०१४ आणि २०१९ यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी मोदी हे प्रचाराला आले होते त्यानंतर आत्ताच्या निवडणुकीत शुक्रवारी पार पडलेली त्यांची ही डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी तिसरी प्रचार सभा झाली. नंदुरबार शहरालगत चौपाळे शिवारात अहिंसा स्कूल समोरील भव्य मैदानावर पार पडलेल्या या सभेप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपिठावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमधील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य केले होते. यावरुन पंतप्रधान मोदी यांनी समाचार घेतला. बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. त्यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावे, असे मोदी म्हणाले.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत भाष्य केले होते. आमची आणि काँग्रेसची विचारधारा सारखी आहे. आमचा सोबत काम करण्याचा अनुभव आहे. निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेचा धुराळा उडाला होता. अखेर शरद पवार यांनाच यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. पण, आता पंतप्रधान मोदी यांच्या ऑफरमुळे वेगळ्या चर्चेचा तोंड फुटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नंदुरबारमधील सभेत काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली. काँग्रेसचा काय हेतू आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे. राहुल गांधी यांचे गुरु जे परदेशात राहतात, त्यांनी भारतीय लोकांवर वर्णभेदी टिप्पणी केली. भारतीय लोक आफ्रिकन दिसतात, असे ते म्हणत आहेत. काँग्रेसचे लोक म्हणतात ‘मोदी तेरी कबर खुदेगी’. या काँग्रेसला येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.

आरक्षणावर खोटे बोलता बोलता बाबासाहेब आंबेडकर यांना देखील जे मंजूर नव्हते ते धर्मावर आधारित आरक्षण देण्याचे षडयंत्र हाती घेतले आहे. एस सी, एस टी आणि ओबीसी लोकांचे आरक्षण मुस्लिम अल्पसंख्याकांना देण्याचा कर्नाटकातला फॉर्मुला काँग्रेस आघाडी देशभर राबवू इच्छिते. एस सी एस टी आणि ओबीसींच्या हक्काचा आरक्षणाचा तुकडा मुस्लिमांना देणार नाही याची लेखी हमी द्या असे काँग्रेसवाल्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मूक धोरण स्वीकारले. याच्यातूनच दाल मे कुछ काला असल्याचे निष्पन्न होते. परंतु त्यांना कितीही प्रयत्न करू द्या मोदी जिवंत आहे तोपर्यंत देशातील सर्व वंचितांच्या मदतीला मोदीचा भरवसा आहे. धर्माच्या आधारावर कणभर सुद्धा आरक्षण जाऊ देणार नाही, वंचितांचा अधिकार राखणारा मी चौकीदार आहे, या शब्दात मोदी यांनी ग्वाही दिली.

Comments
Add Comment