मुंबई : ‘बॉर्डर’ (Border movie) या १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय जवानांच्या संघर्षावर आधारलेल्या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला होता. मल्टी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना भावूक करत त्यांची मने जिंकली होती. यातील ‘संदेसे आते है’ (Sandese aate hain) या गाण्याने आजही भारतीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. या सिनेमाच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाच्या दुसर्या भागाची (Border 2) घोषणा करण्यात आली असून पुढील वर्षात २३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘बॉर्डर २’ या चित्रपटाचे निर्माते म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याचा गौरव करणारा हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रजासत्ताक दिनापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. त्यानुसार २६ जानेवारीपूर्वी २३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करायचं ठरवलं आहे.
सनी देओलसोबत (Sunny Deol) आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खास भूमिका साकारणार आहे. बॉर्डर २ चे दिग्दर्शन अनुराग सिंग (Anurag Singh) करणार आहेत. त्यांनी अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
या चित्रपटाच्या कथेवर जवळपास वर्षभरापासून काम सुरू आहे, असं म्हटलं जात आहे. ‘बॉर्डर पार्ट १’ सारखा हाही ब्लॉकबस्टर चित्रपट व्हावा, या दृष्टीकोनातून चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. मागच्या महिन्यात या चित्रपटाच्या कथेसंदर्भात माहिती समोर आली होती. यावेळी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या युद्धाची कथा दाखवण्यात येणार आहे. राजस्थानमधील थारच्या लोंगेवाला भारतीय चौकीवर ही लढाई झाली होती. हा आजवरचा सर्वात मोठा युद्धपट ठरणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वे शुक्रवारच्या मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा दरम्यान रात्रीचा ब्लॉक घेणार आहे.…
उबाठा शिवसेनेचा निर्धार मेळावा नाशिकमध्ये पार पडला, अर्थात हा उबाठा शिवसेनेच्या प्रमुखांच्या भाषणांमध्ये गेल्या तीन-साडेतीन…
मुंबई: वानखेडेच्या मैदानार इंडियन प्रीमियर लीगमधील ३३व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर जबरदस्त विजय मिळवला…
देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचा मार्ग मोकळा डेहराडून : जानसू रेल्वे बोगद्याचे काम ऐतिहासिक असून,देशातील…
पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात राज्यसेवेची मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी या…
पुणे : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर…