Bhupendra Jogi : 'नाम? भूपेंदर जोगी!' या एका डायलॉगने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्रवर हल्ला!

पाठीला आणि हाताला ४० टाके


भोपाळ : मध्यप्रदेशमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाखतीदरम्यान म्हटलेल्या 'नाम? भूपेंदर जोगी!' या एका डायलॉगने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भूपेंद्र जोगीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दोन व्यक्तींनी भूपेंद्रवर हल्ला केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर भूपेंद्रला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली आहे.


युट्युबर भूपेंद्र जोगीचे न्यू मार्केट परिसरात रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तो दुकानातून घरी परतत असताना रोशनपुराजवळ दोन तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात भूपेंद्र जोगी गंभीर जखमी झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी जखमी भूपेंद्र जोगीला रुग्णालयात नेले. त्याच्या पाठीला आणि हाताला ४० टाके पडले आहेत. या प्रकरणी अरेरा हिल्स पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांना गुन्हेगारांची कोणतीही माहिती मिळाली नाही.


भूपेंद्र जोगीने दावा केला आहे की, त्याला दोनदा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भूपेंद्रचे कोणाशीही वैर किंवा वाद नाही, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. भूपेंद्र जोगीने त्याचे रुग्णालयातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये भूपेंद्र हा त्याची हेल्थ अपडेट देताना दिसत आहे.



कोण आहे भूपेंद्र जोगी?


'नाम? भूपेंदर जोगी!' या एका मुलाखतीमधील डायलॉगमुळे भूपेंद्र जोगी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या डायलॉगचे रिल सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच या डायलॉगवर अनेक नेटकऱ्यांनी मीम्स देखील बनवले. या मीम्समुळे आणि व्हायरल झालेल्या रिलमुळे भूपेंद्र जोगीला लोकप्रियता देखील मिळाली.

Comments
Add Comment

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन