MP Loksabha Election : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 'या' चार मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

जाणून घ्या नेमकं कारण काय?


मध्य प्रदेश : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना निवडणुकीचे पहिले, दुसरे आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान (voting) पार पडले आहे. मात्र मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात चार ठिकाणी पुन्हा मतदान होणार असल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जाहीर केली आहे. बैतूलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी यशस्वीरित्या पार पडले होते. मात्र, मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली होती. त्यामुळे या भागात फेरमतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.


७ मे रोजी बसला लागलेल्या आगीमुळे बसमधील काही ईव्हीएम मशीन्स जळाले होते. त्यामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी १० मे रोजी फेरमतदान पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.



'या' चार जागांवर पुन्हा मतदान होणार


बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील बुथ २७५- राजापूर, बुथ २७६- दुदर रयत, बुथ २७९- कुंदा रयत आणि बुथ २८०- चिखलीमाळ या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. या फेरमतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.


Comments
Add Comment

देशात तब्बल इतक्या टक्के लोकांचे लग्नच झालेले नाही, आकडेवारी वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत

Pm Narendra Modi : पंतप्रधान मोदी गुरुवारी वाराणसीत मॉरिशसच्या पंतप्रधानांना भेटणार

नवी दिल्ली : मॉरिशसचे पंतप्रधान रामगुलाम सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या,

ट्रम्प यांना पुन्हा आली भारताची आठवण, म्हणाले मोदी माझे चांगले मित्र

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही