Air India News : प्रवाशांची गैरसोय! एअर इंडियाची चक्क ७० हून अधिक उड्डाणे रद्द

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


मुंबई : अलीकडे झालेले विस्तारा एअरलाइनवरील संकट निवळले नसून इतक्यात एअर इंडियाला (Air India) आणखी नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने आपली ७० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. टाटा समूहाच्या विमान कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदनात रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांचा समावेश असून उड्डाणे रद्द होण्याचे कारण सांगितले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइनच्या वरिष्ठ क्रू मेंबर्सनी एकाचवेळी आजारी असल्याची रजा (sick leave) दिली आहे. त्यामुळे एअरलाईनला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. क्रू मेंबर्स अचानक रजेवर गेल्याने वादाचे संकेत मिळत आहेत. हे प्रकरण नागरी विमान वाहतूक विभागापर्यंत पोहोचले असून अधिकारी या प्रकरणात हस्तक्षेप करत आहेत.


दरम्यान, अचानक विमान उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, "एअरलाइनच्या केबिन क्रूच्या एका गटाने मंगळवारी रात्री शेवटच्या क्षणी आजारपणाच्या सुट्ट्या घेतल्या. ज्यामुळे फ्लाइटला उशीर करावा लागला आणि फ्लाइट रद्द करण्यात आली".


"या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी चर्चा करत आहोत. एअरलाइन टीम सक्रियपणे या समस्येकडे लक्ष देत आहेत आणि समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइन दिलगिरी व्यक्त करतो". "फ्लाइट रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना पूर्ण परतावा दिला जाईल. किंवा इतर तारखेला फ्लाइट निश्चित होईल, असंही प्रवक्त्याने सांगितलं आहे. प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी त्यांचे उड्डाण रद्द झाले आहे की नाही हे तपासावे", असे आवाहन देखील एअर इंडियाकडून करण्यात आले आहे

Comments
Add Comment

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या