Weather Update : तापमान ४४ अंशा पलीकडे जाणार, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा!

राज्यातील 'या' भागात सूर्याची आग तर काही भागांत पावसाचा यलो अलर्ट


मुंबई : देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना अनेक राज्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच सूर्य आणखी आग ओकणार असून तापमान ४४ अंशाच्या पलीकडे जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात नागरिकांना आणखी उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.


महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा कमी होत नाही. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता तसेच वेगाने वारे वाहत हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.



'या' भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट


राज्यात पुढील १० मे पर्यंत विदर्भ पट्ट्यामध्ये उष्ण वातावरण कायम राहणार असून, सध्याच्या घडीला सोलापूर आणि अकोल्यामध्ये सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, लातूर आणि नांदेडमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर प्राथमिक स्तरावर या भागांमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


सध्याच्या घडीला तामिळनाडूच्या दक्षिणेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, १०मे पर्यंत जळगाव, सोलापूर, अहमदनगर आणि पुण्यातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेच्या वेळी तापमानात काही अंशांची घट होत असली तरीही दुपारच्या वेळी मात्र सूर्याचा दाह वाढत जाणार असून, सायंकाळीही तापमानात घट होणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगितले आहे.

Comments
Add Comment

Aniket Nikam : ‘भाषण विसरणाऱ्या अमित ठाकरेंनी आधी स्वतःचे कर्तृत्व पाहावे’; भाजप प्रवक्ते अनिकेत निकम यांचा टोला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम

CM Devendra Fadnavis : गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मुंबई : महाराष्ट्राचा

Devendra Fadnavis : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्राशी चर्चा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; कुटुंबीयांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील सर्व मोठ्या आस्थापनांचे फायर ऑडिट होणार; महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (Fire Audit) आणि आग प्रतिबंधक

Navnath Ban : MPSC पेपरफुटी प्रकरणावरून नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस

MPSC Paper Leak : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणात भाजप-शरद पवार गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपरफुटी पेपरफुटीप्रकरणात भाजप