Uber Fake Fare Scam : सावधान! चालकांची हातचलाखी; उबरने दिला सतर्कतेचा इशारा

'अशा' प्रकारे होतेय प्रवाशांची लूट


मुंबई : देशभरात विविध प्रकारचे स्कॅम होत असतानाच आणखी एका नव्या स्कॅमची भर पडली आहे. ऑनलाईन कॅब सुविधा पुरवणाऱ्या उबर कंपनीने सध्या मार्केटमध्ये 'फेक फेअर स्क्रीन' हा स्कॅम होत असल्याचं सांगितलं आहे. प्रवाशांनी याबाबत सावधानता न बाळगल्यास त्याचा मोठा भुर्दंड बसू शकतो, असा सतर्कतेचा इशारा उबरने दिला आहे. जाणून घ्या नक्की प्रकरण काय व यापासून तुम्ही कसा बचाव करु शकता.


उबरने दिलेल्या माहितीनुसार, कित्येक ठिकाणी हा स्कॅम समोर आला आहे. यामध्ये ट्रिप पूर्ण झाल्यानंतर चालक हे प्रवाशांना बिलाची रक्कम दाखवताना हातचलाखी करतात. फोनची स्क्रीन दाखवताना ते दुसरीच रक्कम असणारी वेगळी स्क्रीन दाखवतात. स्क्रीनवर दिसत असलेल्या रक्कमेप्रमाणे प्रवास चालकांना तितकेच पैसे देतात. मात्र, ही रक्कम मूळ रकमेपेक्षा जास्त असते. उबरकडे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यामुळे कंपनीने सर्व प्रवाशांना याबाबत इशारा दिला आहे.



स्कॅमपासून 'असा' करा बचाव



  • आपली ट्रिप सुरू करण्यापूर्वी उबर अ‍ॅपमधील माहितीनुसार चालक आणि वाहनाच्या डीटेल्स तपासून घ्या.

  • ओटीपी शेअर केल्यानंतर ट्रिप व्हेरिफाय करा.

  • डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर ड्रायव्हरला ट्रिप एंड करायला सांगा.

  • ड्रायव्हरच्या स्क्रीनवर दिसणारी रक्कम आणि तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारी रक्कम तपासून घ्या.

  • तुमच्या स्क्रीनवर दिसणारीच रक्कम पे करा.


चालक चुकीची स्क्रीन दाखवत असल्याचा संशय आल्यास 'या' गोष्टी करा -



  • ड्रायव्हरला आपला डिस्प्ले रिफ्रेश करायला सांगा.

  • तुम्हीदेखील अ‍ॅप रिफ्रेश करून घ्या.

  • ड्रायव्हरच्या स्क्रीनवरील रक्कम आणि तुमच्या स्क्रीनवरील रक्कम वेगळी असेल, आणि त्याने अधिकची रक्कम घेतल्याशिवाय सोडलंच नाही तर तुमच्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट, पेमेंटचा स्क्रीनशॉट अशा गोष्टी सांभाळून ठेवा.

  • यानंतर अ‍ॅपच्या हेल्प सेक्शनमध्ये जाऊन तक्रार करा, आणि पुरावा म्हणून ते सर्व स्क्रीनशॉट्स दाखवा.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१