Mobile: तुमच्या या चुकांमुळे मोबाईलची बॅटरी पटापट संपते

  129

मुंबई: हल्ली मोबाईल फोन(mobile phone) सगळ्यांची गरज बनली आहे. फोन नेहमी व्यवस्थित चालू राहावा यासाठी आपण विविध पद्धती वापरतो. नवीन फोन घेतल्यावर त्याला नवीन कव्हर घातले जाते. त्याला स्क्रॅच येऊ नये यासाठी स्क्रीन गार्ड लावले जाते. मात्र जेव्हा फोन जुना होतो तेव्हा काही समस्या सतावू लागता. त्यापैकीच एक म्हणजे फोनची बॅटरी लवकर लवकर संपू लागते. मोबाईल फोनच्या चार्जिंगमध्ये समस्या येऊ लागतात.


एकतर मोबाईल फोन स्लो होतो अथवा बॅटरी लवकर लवकर संपू लागते. फोन जुना झाला की अनेकांना ही समस्या सतावत असते. मात्र असे नेहमीच काही होत नाही. तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळेही फोनच्या बॅटरीमध्ये समस्या येऊ लागतात. तसेच बॅटरीही लवकर लवकर संपते.


उन्हाळ्याच्या दिवसांत फोन अधिक गरम होण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला माहीत आहे का की चार्जिंगच्या वेळेस फोनचे कव्हर न काढल्यास बॅटरीतून निघणारी गरम हवा मोबाईलच्या कव्हरमुळे बाहेर पडू शकत नाही. बॅटरी गरम झाल्यास चार्जिंग थांबते आणि बॅटरीची टक्के वारी वाढण्याऐवजी कमी होते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत कव्हर काढून चार्जिंग करण्याचा सल्ला दिला जातो.


अनेकदा लोक फोनची बॅटरी एकदम कमी झाल्यावरच चार्ज करतात. अशातच हे जाणून घेणे गरजेचे आहे की अखेर बॅटरी किती टक्के राहिल्यावर चार्ज करायला हवी. जर तुम्ही फोनची बॅटरी १०-१५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावरच चार्जिंगला लावत असाल तर यामुळे बॅटरीवर परिणाम होतो.


फोन कधीही रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नये. ही सवय कोणत्याही फोनसाठी चांगली नसते. फोनला अधिक चार्ज करणेही चांगले नसते. यामुळे बॅटरी खराब होण्याचा धोका वाढतो.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई