Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीLoksabha Election : राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८ टक्के मतदान; दोन टप्प्यांच्या तुलनेत...

Loksabha Election : राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८ टक्के मतदान; दोन टप्प्यांच्या तुलनेत यंदाच्या मतदानात वाढ

जाणून घ्या कोणत्या राज्यात किती टक्के मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात राज्यातील बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या ११ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघातील मतदार केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. राज्यात सध्या ११ वाजेपर्यंत १८.१८ टक्के मतदान झाले असल्यामुळे पहिल्या २ टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

‘या’ मतदारसंघात ११ वाजेपर्यंत इतके टक्के मतदान

लातूर – २०.७४ टक्के
सांगली – १६.६१ टक्के
बारामती – १४.६४ टक्के
हातकणंगले – २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के

कोल्हापूर मतदारसंघात ११ वाजेपर्यंत २३.७७ टक्के मतदान

चंदीगड- २७१- २०.५६ टक्के, कागल- २७३- २३.१८ टक्के, करवीर -२७५- ३१.९५ टक्के, कोल्हापूर उत्तर २७६- २३.२४ टक्के, कोल्हापूर दक्षिण २७४- २२.५५ टक्के, राधानगरी- २७२- २१.४९ टक्के

हातकणंगले मतदारसंघात ११वाजेपर्यंत २०.७४ टक्के मतदान

हातकणंगले- २७८ – २४.१२ टक्के, इचलकरंजी २७९ – २०.२६ टक्के, इस्लामपूर-२८३- २१.७० टक्के, शाहूवाडी- २७७- १७.१६ टक्के शिराळा- २८४- १९.७६ टक्के, शिरोळ – २८०- २१.१० टक्के

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -