Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही जनतेला भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. गुजरातच्या अहमदाबाद येथील निशान हायर सेकंडरी स्कूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावला.


आजच्या तिसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील एकूण ९३ जागांवर मतदान होत आहे. खरंतप ९४ जागांवर आज मतदान होणार होते मात्र भारतीय जनता पक्षाने गुजरातच्या सुरतमध्ये बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होत आहे.


तिसऱ्या टप्प्यात गोवामधील २, गुजरातच्या २५, छत्तीसगडच्या ७, कर्नाटकमधील १४, आसाममधील ४, बिहारच्या ५, मध्य प्रदेशातील ११, उत्तर प्रदेशातील १०, पश्चिम बंगालच्या ४, दादरा नगर हवेली आणि दमणच्या जागांवर मतदान होत आहे.


या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.


रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर सातारा मतदारसंघातून उदयनराजे निवडणूक लढवत आहेत. सोलापुरमधून महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या मैदानात आहेत तर महायुतीकडून राम सातपुते निवडणूक लढवत आहेत. तर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या संजय मंडलिक आणि मविआच्या छत्रपती शाहू महाराजांमध्ये सामना रंगणार आहे.


आजचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यासाठी १३ मेला मतदान, पाचव्या टप्प्यासाठी २० मेला, सहाव्या टप्प्यासाठी २५ मेला आणि सातव्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार आहे. १८व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर केले जातील.

Comments
Add Comment

देशभरात ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगवर बंदी येणार ?

नवी दिल्ली: देशात वाढत्या ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकीच्या धडकेत बसला भीषण आग! २० जणांचा मृत्यू, चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केले दु:ख

आंध्र प्रदेशः हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ आज पहाटे आगीबाबत एक मोठी

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून