Cyber Crime : मित्रासोबतचे वाद मिटवण्याच्या नादात ज्योतिषाने लावला चुना!

जाणून घ्या नक्की प्रकरण काय?


मुंबई : देशभरात मोठ्या प्रमाणात सायबर जाळे पसरत आहे. कधी अकाउंट हॅक करणं तर कधी खोटी व्यक्ती बनून फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. अशीच फसवणूक करणाऱ्या लबाड्यांच्या जाळ्यात मुंबईतील एक तरूणी अडकली. मित्रासोबतचे मतभेद मिटवण्यासाठी एका २४ वर्षीय तरुणीने ऑनलाईन अनोळखी ज्योतिषाची मदत घेतली होती. मात्र, यामार्फत ती सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकली आणि तिला हजारो रुपयांचा चुना लावण्यात आला.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुज पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला मोबाईलमधील एका सोशल मीडिया अ‍ॅपवर एका ज्योतिषाबाबत चॅटिंगसाठी लिंक आली होती. तिने त्यावर क्लिक केले असता तिला एक मोबाईल नंबर मिळाला. तरुणीने तिच्या व्हाट्सअप क्रमांकवरून चॅटिंग सुरू केल्यावर समोरच्या व्यक्तीने तो ज्योतिषी असल्याचे सांगत व्हॉट्सॲप कॉल करत तरुणीची माहिती मागितली. त्यानुसार तिने माहिती आणि तिचा फोटो त्या भामट्यांना पाठवला. समोरील व्यक्तीला तक्रारदाराने फोन केल्यावर त्याने तिला ६ हजार १०० रुपये पाठवायला सांगत एक क्यूआर कोड शेअर केला.


तरुणीने पैसे पाठवल्यानंतर पुन्हा तिच्याकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच 'तुला मित्राकडून फोन येईल पण तो तू रिसीव्ह करू नको' असे भामट्यांनी सांगितले. कारण, त्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडत तो फेक कॉल आहे हे तिला समजले असते. तरुणीने त्यांच्यावर विश्वास ठेवत फोन उचलला नाही. मात्र नंतर तिने तिच्या मित्राला फोन केल्यावर त्याने तिला फोन केलाच नसल्याचे सांगितले आणि हा फसवणूकीचा प्रकार तिच्या लक्षात आला. या विरोधात तिने सांताक्रुज पोलिसात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित

अक्षया नाईकचं ओटीटीवर पदार्पण

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. तिच्या सोशल मीडिया