
DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. गुणतालिकेत राजस्थानचा संघ 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दिल्लीला उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. दरम्यान राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दिल्लीला जेक फ्रेझर मॅकगर्कच्या रुपात पहिला धक्का बसला खरा पण याआधीच अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावून त्याने आपली कामगिरी बजावली. अभिषेक पोरेलने देखील आक्रमक खेळी करत 65 धावा केल्या. आर अश्विनने त्याची विकेट घेतली. अभिषेक पोरेलने अवघ्या 36 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत 15 धावा करुन बाद झाला. दिल्लीच्या तळातील फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीने दिल्ली 8 गडी गमावत 221 धावांवर पोहचली. दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानसमोर विजयासाठी 222 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचे सलामीवीर विशेष काही करु शकले नाहीत. जॉस बटलर १९ धावांवर तर यशस्वी जयस्वाल अवघ्या ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार संजु सॅमसंगने आक्रमक खेळीने संघाची धुरा सांभाळली. अवघ्या ४६ चेंडुत ८६ धावा बनवुन तो झेलबाद झाला. संजुचा झेल होपने अगदी सीमारेषेवर पकडल्याने वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. मात्र थर्ड-अंपायरच्या निर्णयानंतर संजुला परतावे लागले.
रियान पराग २७ धावा आणि शुभम दुबे २५ धावा बनवत बाद झाले. पण राजस्थानच्या फलंदाजांना आव्हान पुर्ण करता आले नाही. राजस्थानचा या सामन्यात २० धावांनी पराभव झाला. दिल्ली खलील अहमद, मुकेश कुमार, कुलदीप यादव या गोलंदाजांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले, तर अक्षर पटेल आणि रसिख दार सलामने प्रत्येकी एक गडी बाद केला. आणि दिल्लीला विजय मिळवुन दिला.