मुंबई : देशभरात निवडणुकांची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना बड्या बड्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच भाजपाकडून (BJP) उमेदवारी मिळालेली बॉलिवूडची क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) हीदेखील हिमाचलमधील मंडीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर तिने जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारादरम्यान कंगनाने केलेल्या एका मोठ्या घोषणामुळे राजकीयसहित सिनेसृष्टीतील वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.
कंगनाने लोकसभा निवडणूक जिंकल्यास बॉलिवूड सोडणार असल्याची घोषणा केली. तिने बॉलिवूड सोडून पूर्णवेळ राजकारणाला वेळ देणार असल्याचं ठरवलं आहे. निवडणूक जिंकल्यास पुढे काय करणार, या प्रश्नावर कंगना म्हणाली की, ‘मी सिनेमाच्या कामानेही कंटाळली आहे. मला राजकारणात यश मिळाल्यास, लोक सोबत राहतील, तर मी राजकारणच करेन. मी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे’.
‘लोकांना माझी गरज असेल, तर मी त्या दिशेने काम करेन. मला अनेक फिल्ममेकर म्हणाले की, ‘राजकारणात नको जाऊ’. माझ्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी लोक म्हणत आहे की, हे योग्य नाही. मी प्रिविलेज आयुष्य जगले आहे. आता लोकांना जोडण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे त्याला पूर्ण करु इच्छित आहे. लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे’ असेही कंगनाने म्हटले आहे.
राजकारण आणि सिनेसृष्टीच्या प्रश्नावर अभिनेत्री कंगना म्हणाली, ‘सिनेसृष्टी आणि राजकीय आयुष्य खूप वेगळं असतं. सिनेसृष्टीतील आयुष्य एक खोटं आयुष्य असतं. तिथे वेगळं आयुष्य भासवलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगळं आयुष्य भासवलं जातं. तर राजकारण हे एक वास्तव आहे. मी लोकसेवेत नवीन आहे. मला खूप काही शिकायचं आहे’.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…