T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेच्या संघाची घोषणा, भारतीय खेळाडूंचा भरणा

Share

मुंबई:आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४ची(icc mens cricket world cup 2024) क्रिकेट चाहते अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. यावेळेस टी-२० वर्ल्डकप १ जूनपासून २९ जूनपर्यंत संयुक्त राज्य अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जात आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी सहयजमानपद निभावणाऱ्या अमेरिकेनेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय यूएसए संघाचे नेतृत्व मोनांक पटेल करत आहे. मोनांकचा जन्म गुजरातच्या आनंद शहरात झाला होता. मोनांकने अंडर १९ स्तरावर गुजरातचे प्रतिनिधित्व केले होते मात्र त्यानंतर तो अमेरिकेत गेला.

उन्मुक्त-स्मितला मिळाली नाही जागा

मोनांक पटेलशिवाय भारतीय वंशाचे अनेक खेळाडू १५ सदस्यीय संघात आहेत. दरम्यान, उन्मुक्त चंदला संघात स्थान मिळालेले नाही. चंदच्या नेतृत्वात भारताने २०१२मध्ये अंडर १९ चा वर्ल्डकप जिंकला होता. विकेटकीपर फलंदाज स्मित पटेललाही संधी मिळालेली नाही.

 

संघात दोन उजव्या हाताच्या फलंदाजांचाही समावेश आहे. मिलिंदने २०१८-१९च्या रणजी ट्रॉफी सत्रात सिक्कीमचे प्रतिनिधित्व करताना १३३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्रिपुराचेही प्रतिनिधित्व केले. यानंतर तो चांगल्या संधीच्या शोधात अमेरिकेला गेला. २०२१मध्ये अमेरिकेत पदार्पण करण्याआधी तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स(आताची दिल्ली कॅपिटल) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी अमेरिकेचा संघ – मोनांक पटेल(कर्णधार), आरोन जोन्स(उप कर्णधार), एंड्रीज गौस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंह, जेसी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुश केनजिगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली वान शल्कविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.

रिझर्व्ह खेळाडू – गजानन सिंह, जुआनॉय ड्रिस्डेल, यासिर मोहम्मद.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

60 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

1 hour ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

1 hour ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

1 hour ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

1 hour ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago