अकोला : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच आता अकोला जिल्ह्यातून (Akola news) अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा आज दुपारी पातूर शहराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ व्यक्तींचा समावेश आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. वाशिम रोडवर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
अपघातामध्ये किरण सरनाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले (वय ३०), सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५) आणि एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…