Suresh Raina : क्रिकेटर सुरेश रैनाच्या भावासह आणखी एकाचा रस्ते अपघातात मृत्यू

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत केला गुन्हा दाखल


शिमला : भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैनावर (Suresh Raina) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कालच सुरेश रैनाने परळ येथील बाजराला भेट देऊन जांभूळ खरेदी केले होते. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच त्याच्या कुटुंबात एक दुखःद घटना घडली आहे. सुरेश रैनाच्या चुलत भावासह दोन जणांना रस्ता अपघातात (Road Accident) जीव गमवावा लागला आहे. ही 'हिट अँड रन'ची केस (Hit and run case) असल्याचे गग्गल पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात काल रात्री हा अपघात झाला. सुरेश रैनाचा चुलत भाऊ सौरव कुमार रात्री जवळपास पावणेअकरा वाजेपर्यंत दुकानात काम करत होता. दुकान बंद करुन घरी जात असताना अपघाताची घटना घडली. अपघातानंतर आरोपी पळून गेला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला बाजारपेठेतून पकडले. टॅक्सी आणि स्कूटरमध्ये हा अपघात झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:३० च्या सुमारास गग्गल येथे अज्ञात वाहनाने स्कूटरला धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव शेर सिंग असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन्ही स्कूटरस्वारांचा मृत्यू झाला, एकाचे नाव सौरव कुमार तर दुसऱ्याचे नाव शुभम असल्याचे सांगण्यात आले आहे. सौरव हा गग्गल आणि शुभम हे कुठमा येथील रहिवासी होते.



सुरेश रैना सध्या आयपीएल २०२४ मध्ये करतोय कॉमेंट्री


हिमाचलच्या गग्गल परिसरात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचे माहेर आहे. रैना आणि त्याच्या कुटुंबासाठी ही दुःखद बातमी आहे. सध्या सुरेश रैना आयपीएल २०२४ मध्ये कॉमेंट्री करताना दिसत आहे. स्पर्धेतील जवळपास सर्वच सामन्यांमध्ये तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसून येतो. सुरेश रैनाची कॉमेंट्री चाहत्यांनाही खूप आवडते. त्याच्या बोलण्याच्या शैलीने चाहते प्रभावित होत आहेत.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान