Tutari : तुतारीमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी अडचणीत!

बारामतीपाठोपाठ शिरुरमध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह!


मुंबई : बारामतीपाठोपाठ शिरूरमध्येही एका अपक्ष उमेदवाराला तुतारी (Tutari - Trumpet) चिन्ह देण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे नवे पक्षचिन्ह दिले आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांनाही तुतारी (Trumpet) हे चिन्ह दिले जात असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार आणि यंदाच्या निवडणुकीतील उमेदवार असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारांना नुकतेच चिन्हांचे वाटप केले आहे. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आले आहे. या चिन्हाचे आयोगाकडून मराठीत तुतारी असे भाषांतर करण्यात आले आहे. खरेतर हे चिन्ह दिसण्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. मात्र आयोगाने ट्रम्पेटचे भाषांतर तुतारी असे केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी निवडणूक आयोगाकडे तुतारी या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना हे चिन्ह मिळाले आहे. मी निवडणूक आयोगाकडून मागितल्याप्रमाणे मला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. माझ्या समोरच्या उमेदवाराला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे या चिन्हामध्ये मतदारांची दिशाभूल होणार नाही, असे वाडेकर यांनी म्हटले आहे.


दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवारालाही आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले आहे. ट्रम्पेट चिन्ह आणि ‘तुतारी’त साधर्म्य असल्याने बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र हा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला होता. आक्षेप घेण्याची वेळ निघून गेल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी सांगितले होते.

Comments
Add Comment

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा