IPL 2024: कोलकाताने दिल्लीला हरवत पॉईंट्स टेबलमध्ये केला बदल?

Share

मुंबई: आयपीएल २०२४मधील ४७वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात कोलकाताने ७ विकेटनी विजय मिळवला. हा केकेआरचा एकतर्फी विजय होता. आता या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झाले आहेत ते जाणून घेऊया…

दिल्लीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर कोलकाता १२ गुण आणि +1.096 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पराभव झालेला दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीकडे १० गुण आणि -0.442 हा रनरेट आहे.

पॉईंट्सटेबलमधील टॉप ४ संघांवर नजर टाकली असताना राजस्थान रॉयल्स १६ पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता १२ पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर येते. यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद १०-१० गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. चेन्नईकडे +0.810 आणि हैदराबादकडे +0.075 चा रनरेट आहे.

बाकी संघाची अशी स्थिती

बाकी संघाना पाहिल्यास लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स १०-१० गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. त्यानंतर गुजरात टायटन्स ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यानंतर पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ६-६ गुणांसह अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

15 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

52 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago