Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे महानालायक!

  130

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेची बोचरी टीका


मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्सवरून टीका करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा महानालायक असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.


महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ सोलापूरात उद्धव ठाकरे यांची काल सभा झाली. या सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर आता भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.


महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत. पण उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली, बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.





उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा नकोशी झाली असल्याचेही बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावे की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा, मात्र ४ जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास स्वामींनी लिहिलेल्या काही ओळींचा आधार घेत उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये | संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||| असे रामदास स्वामींनी लिहिलेल्या 'मुर्खांची लक्षणं' या ओळींचा वापर करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.

Comments
Add Comment

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच